शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

सराफाच्या हत्येचे आरोपी २४ तासात शोधणारे पोलीस निरीक्षक अहिरराव केंद्रीय पदकाने सन्मानित 

By धीरज परब | Updated: August 13, 2022 17:18 IST

Police News: मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मनुष्य वध तपास पथकाचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना सराफाची हत्या करणाऱ्या आरोपीना २४ तासात पकडून उत्कृष्ट तपासा बद्दल केंद्र सरकारच्या गृह विभागाने केंद्रीय गृहमंत्री पदक मंजूर करून सन्मानित केले आहे.

-धीरज परबमीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मनुष्य वध तपास पथकाचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना सराफाची हत्या करणाऱ्या आरोपीना २४ तासात पकडून उत्कृष्ट तपासा बद्दल केंद्र सरकारच्या गृह विभागाने केंद्रीय गृहमंत्री पदक मंजूर करून सन्मानित केले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून क्लिष्ट, थरारक व बहुचर्चित संवेदनशील गुन्हयांच्या उत्कृष्ट तपासाकरिता ‘केंद्रीय गृहमंत्री पदक' प्रदान करण्यात येत असते. केंद्रीय मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ११ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदरचे पदक प्रदान करण्यात येत असते. यंदा सदर केंद्रीय पदकाचा बहुमान मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील दोघा अधिकाऱ्यांना मिळाला आहे . नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  जितेंद्र वनकोटी व गुन्हे शाखेतील मनुष्यवध तपास पथकाचे पोलीस निरीक्षक समीर अहीरराव यांना यावर्षीचे 'केंद्रीय गृहमंत्री पदक' मंजुर करण्यात आले आहे.

२१ ऑगस्ट २०२१ रोजी नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीतील एसटी डेपो मार्गावर असलेल्या चंद्रेश पॅलेस मधील साक्षी ज्वेलर्स चे मालक किशोर जैन यांची हत्या करण्यात आली होती . आरोपींनी त्यांचे दोन्ही हात सेलोटेपने बांधून त्यांच्या डोक्यावर व शरीरावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन जिवे ठार मारुन दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेले होते.

गुन्हयातील अज्ञात आरोपीतांनी स्वतःची ओळख लपविण्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेवून सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला होता. सदरचा क्लीष्ट व संवेदनशील गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस ठाणे व गुन्हे शाखेतील अधिकारी - अंमलदार यांनी अज्ञात आरोपींचा शोध चालवला होता . तयावेळी नालासोपारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले समीर अहीरराव पोलीस पथकासह अज्ञात आरोपीतांची ओळख निष्पन्न करुन गुन्हे शाखेतील अधिकारी व  अंमलदार यांच्या मदतीने दोन्ही आरोपीना २४ तासाच्या आत अटक केली होती. एका आरोपीला मुंबईच्या ताडदेव तर दुसऱ्याला भाईंदर मधून पकडण्यात आले होते . त्यातील एक आरोपी पोल्स रेकॉर्ड वरचा होता . अहिरराव यांनी सदर गुन्हयाचा योग्य रित्या तपास करुन न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले होते.  

टॅग्स :PoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर