दुचाकीस्वाराच्या डोक्यात पोलिसाने मारली काठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:44 IST2021-09-22T04:44:57+5:302021-09-22T04:44:57+5:30

कल्याण : कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात नाकाबंदीच्या दरम्यान एका पोलिसाने एका दुचाकीस्वाराच्या डोक्यात काठी मारल्याने, तो जखमी झाल्याची ...

Police hit the cyclist on the head with a stick | दुचाकीस्वाराच्या डोक्यात पोलिसाने मारली काठी

दुचाकीस्वाराच्या डोक्यात पोलिसाने मारली काठी

कल्याण : कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात नाकाबंदीच्या दरम्यान एका पोलिसाने एका दुचाकीस्वाराच्या डोक्यात काठी मारल्याने, तो जखमी झाल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या डोक्याला दुखापत झाल्याने टाके घालण्यात आले असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी तरुणाचे नाव नीलेश कदम असे आहे. पोलिसांनी विनाकारण डोक्यात काठी मारल्याचा आरोप त्याने केला आहे. या संदर्भात पोलिसांनी काही माहिती देण्यास नकार दिला आहे.

नीलेश हा त्याचा मित्र भुपेंद्र झुगरे याच्यासोबत दुचाकीने कल्याणहून उल्हासनगरला जात होता. त्यावेळी ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेलेल्या नीलेशला पोलिसांनी पिटाळून लावले. पोलीस नाकाबंदीच्या दरम्यान वाहन चालकाला अडवून त्याची तपासणी करू शकतात. मात्र, त्याला मारहाण करू शकत नाहीत. याकडे त्याने लक्ष वेधले आहे.

Web Title: Police hit the cyclist on the head with a stick