एक्स्प्रेसमध्ये गुंडांची पोलिसांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 02:37 IST2018-10-23T02:37:29+5:302018-10-23T02:37:30+5:30

मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये रविवारी रात्री दोन गुंडांनी प्रवाशांना त्रास देऊन चेन पुलिंग केले.

Police in the express train | एक्स्प्रेसमध्ये गुंडांची पोलिसांवर दगडफेक

एक्स्प्रेसमध्ये गुंडांची पोलिसांवर दगडफेक

डोंबिवली : मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये रविवारी रात्री दोन गुंडांनी प्रवाशांना त्रास देऊन चेन पुलिंग केले. प्रवाशांना त्रास का दिला, चेन का खेचली, अशी विचारणा करणाºया आरपीएफ जवानावरही गुंडांनी हल्ला करत दगडफेक केली. यात एक जवान जखमी झाला.
नंदीग्राम एक्स्प्रेस कल्याण स्थानकातून रवाना झाल्यानंतर कसारा स्थानकापर्यंत दोन गुंडांनी सहप्रवाशांना त्रास दिला. त्याचा जाब विचारणाºया आरपीएफ जवान रामनिवास सिंग यांच्याशी गुंडांनी हुज्जत घातली. सागर जाधव आणि देवासिंग अशी या आरोपींची नावे असून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळ काढला. पोलीस पाठलाग करीत असल्याचे कळताच त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. या दगडफेकीत जवान रामनिवास सिंह यांना किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. सोमवारी दिवसभर कसारा स्थानक परिसरात दोन्ही गुंडांची शोध मोहिम सुरू होती. दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, हल्ल्याची तक्रार आरपीएफ अधिकाºयांनी दिली आहे.

Web Title: Police in the express train