शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पोलिसांनी घटवली हमीची रक्कम, मनसे कोर्टात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:48 AM

मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी सोमवारी रात्री बजावलेल्या एक कोटीच्या हमीदाराच्या नोटिशीत सुधारणा करत ती मंगळवारी पाच लाखावर आणण्यात आली.

ठाणे : मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी सोमवारी रात्री बजावलेल्या एक कोटीच्या हमीदाराच्या नोटिशीत सुधारणा करत ती मंगळवारी पाच लाखावर आणण्यात आली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि इतर पदाधिकाºयांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यावर ही रक्कम घटवण्यात आली.फेरीवाल्यांविरुद्ध पुन्हा मनसेतर्फे आक्रमक आंदोलन होण्याची शक्यता असल्याने पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीच्या हमीसाठी जाधव यांच्याकडे एक कोटीच्या हमीदाराची मागणी करणारी नोटीस नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी बजावली. तिला सात दिवसांत उत्तर देण्याची मुदत आहे. ही नोटीस आल्यावर नाराजीचा सूर उमटताच मनसेचे नेते नांदगावकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर ही हमीची रक्कम घटवून पाच लाख करण्यात आली. त्याविरोधातही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे नंतर नांदगावकर म्हणाले.अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे. अध्यादेश सरकारचा आहे. हे काम पालिका, रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी करायला हवे होते. ते आमच्या मनसैनिकांनी केले. आम्ही १५ दिवसांची मुदत रेल्वे प्रशासनाला दिली होती. त्यानंतरही कारवाई न झाल्याने आंदोलन झाले. त्यामुळे एक कोटीची हमीची रक्कम रेल्वे प्रशासनाने भरायला हवी, कोणत्याही कायद्यात अशा हमी रकमेचा उल्लेख नाही, याकडे नांदगावकर यांनी लक्ष वेधले.पोलिसांचा मनसैनीकांबाबत असाच दृष्टीकोन राहिला, तर अनेक मनसैनिक तडीपार होतील, अशी भीतीही या नेत्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :MNSमनसेhawkersफेरीवाले