शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतीची दुरवस्था; पडघ्यातील विदारक परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:46 IST

पोलीस ठाण्यातील कर्मचारी जीव मुठीत घेऊन आपल्या निवासस्थानांत राहत आहेत

- मेघनाथ विशे पडघा : ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे तसेच संवेदनशील पोलीस ठाणे म्हणून ओळख असलेल्या पडघा पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. या पोलीस ठाण्यातील कर्मचारी जीव मुठीत घेऊन आपल्या निवासस्थानांत राहत आहेत. काही दिवसांपूर्वीच येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या निवासस्थानातील प्लास्टर कोसळले होते.काही वर्षांपूर्वी पोलीस कर्मचाºयांसाठी असलेल्या पोलीस लाइनमधील गणेशोत्सव हा पडघ्यातील मानाचा गणपती समजला जायचा. मात्र, पोलीस वसाहतीच्या झालेल्या दुरवस्थेमुळे हळूहळू येथे राहणाºया पोलीस कुटुंबीयांनी दुसरीकडे राहण्यास पसंती दिल्याने २१ खोल्यांपैकी केवळ पाच खोल्यांमध्ये पोलीस कुटुंबे राहत असल्याने हा उत्सवही बंद झाला.गळके छप्पर, वाढलेले गवत, उंदीरघुशींचा त्रास, स्वच्छतागृहाचे तुटलेले दरवाजे यामुळे राहणाºयांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी साधी पाहणी करण्याकरिताही येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. यामुळे येथे राहण्यासाठी पोलीस कर्मचारी उदासीन आहेत. विशेष म्हणजे एवढी दुरवस्था असतानाही देखभाल व दुरुस्तीवर वर्षभरात काहीच खर्च झाला नसल्याचे उपअभियंता सचिन धात्रक यांच्याकडून सांगण्यात आले. पोलीस वसाहत व पोलीस ठाण्याची दुरवस्था झालेली इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत उभारली जावी, अशी मागणी काही वर्षांपासून सुरू आहे. गृहखात्याने या मागणीची तातडीने दखल घेऊन नवी इमारत बांधून द्यावी अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबीयांनी केली आहे.वसाहतीपेक्षा झोपडपट्टीत राहणे परवडलेपडघा पोलीस ठाण्यामधील एका पोलिसाला आपण वसाहतीत का राहत नाहीत, असे विचारले असता येथे राहण्यापेक्षा झोपडपट्टीत राहिलेले परवडले, अशा शब्दांत त्याने नाव न छापण्याच्या अटीवर संताप व्यक्त केला.निवासस्थानाच्या दुरवस्थेमुळे आमचे कुटुंब जीव धोक्यात घालून राहतो असेही यावेळी सांगण्यात आले. प्रशासनाने त्वरित हालचाल करून आमच्या घरांची दुरूस्ती करावी अशी मागणी केली जात आहे.माझ्या निवासस्थानातील प्लास्टरचा काही भाग कोसळला होता, हे खरे आहे. मुळात पोलीस ठाणे, कर्मचारी व अधिकाºयांचे निवासस्थान हे राहण्याजोगे आहे का, याची पाहणी करून अहवाल सादर करावा, याकरिता सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आम्ही सातत्याने पत्रव्यवहार केला आहे.- संजय हजारे, पोलीस निरीक्षकयेथे नवीन इमारत बांधण्यासाठी यापूर्वीच अंदाजपत्रक बनवून मंजुरीसाठी गृहखात्याकडे पाठवले आहे. मंजुरी मिळाली की आम्हाला कामाला सुरूवात करता येईल.- सचिन धात्रक, उपअभियंता

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे