सोनसाखळी खेचून नेणाऱ्यास पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:36 IST2021-03-15T04:36:17+5:302021-03-15T04:36:17+5:30

मीरा रोड : भाईंदर पश्चिम येथील बेकरी गल्लीतल्या अमर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्ध महिला जिन्यावरून जात होत्या. त्यावेळी ...

Police caught the man pulling the gold chain | सोनसाखळी खेचून नेणाऱ्यास पोलिसांनी पकडले

सोनसाखळी खेचून नेणाऱ्यास पोलिसांनी पकडले

मीरा रोड : भाईंदर पश्चिम येथील बेकरी गल्लीतल्या अमर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय वृद्ध महिला जिन्यावरून जात होत्या. त्यावेळी मागून आलेल्या लुटारूने वृद्धेस बाजूला हो, असे सांगत गळ्यातील ६५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम सोन्याची चेन खेचून पळू लागला. वृद्धेने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक चोरट्याच्या मागे पळू लागले. त्यावेळी गस्तीवर असलेले पोलीस रवींद्र बेलदार व छोटू साबळे यांनी नागरिकांच्या मदतीने चोरट्यास पकडले. त्याच्याकडून वृद्धेची चोरलेली सोनसाखळी जप्त केली आहे. जितेश धीरेंद्र झा (३४) असे आरोपीचे नाव आहे.

कारचालकास अटक

भाईंदर : भाईंदर पश्चिमेस उड्डाणपुलाजवळ पहाटे तीनच्यासुमारास भरधाव व बेशिस्तपणे कार चालवणाऱ्यास पोलिसांनी थांबण्यास सांगूनही तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले असता, त्याच्याकडे गाडीची कागदपत्रे मागितली असता, ती नव्हती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दंड ठोठावला आहे.

Web Title: Police caught the man pulling the gold chain