विसर्जनावेळी पोलिसाला मारहाण ,तिघांना अटक : कल्याणमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 02:37 AM2017-09-07T02:37:03+5:302017-09-07T02:37:13+5:30

गणेश विसर्जनाच्या वेळी आपसात मारहाण करणाºया तिघांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच त्यांनी जबर मारहाण केली. ही घटना पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवर मंगळवारी घडली.

 Police arrests policeman, three arrested: Kalyan incident | विसर्जनावेळी पोलिसाला मारहाण ,तिघांना अटक : कल्याणमधील घटना

विसर्जनावेळी पोलिसाला मारहाण ,तिघांना अटक : कल्याणमधील घटना

Next

कल्याण : गणेश विसर्जनाच्या वेळी आपसात मारहाण करणाºया तिघांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच त्यांनी जबर मारहाण केली. ही घटना पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवर मंगळवारी घडली. संतोष भोईर (३२) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. मारहाण करणाºयांनी त्यांचा गणवेश फाडत त्यांना चावाही घेतल्याचे उघड झाले. याप्रकरणी तिघांना महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.
दत्ता सुनील जाधव, रवींद्र सुनील जाधव आणि सुदेश कालिप्रसाद गुप्ता (सर्व रा. मिलिंदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. भोईर हे मंगळवारी गस्त घालत होते. आरोपी आपसात मारहाण करत असल्याचे दिसताच भोईर त्यांना सोडवण्यासाठी सरसावले. या वेळी तिघांनी मिळून भोईर यांना मारहाण केली. त्यांचा गणवेश फाडला. त्यांना चावा घेतला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केवळ भोईर यांना मारहाण करून हे तिघे थांबले नाहीत, तर त्यांनी आपसात एकमेकांनाही दुखापत केली.
दरम्यान, मागील वर्षी विसर्जनाच्या दिवशी कल्याण पूर्वेत पोलीस अधिकाºयाला पाण्यात बुडवण्याचा प्रकार घडल्याचा आरोप झाला होता. नंतर त्या प्रकरणात वेगवेगळे मुद्दे समोर आले होते. या प्रकरणातील आरोपींना अद्याप जमीन मिळालेला नाही. त्यानंतर यंदाच्या वर्षी विसर्जनाच्या दिवशीच पोलिसाला मारहाण घडल्याचा प्रकार घडल्याने विसर्जनाच्या दिवशी पोलिसांना अशा घटनांचा सामना करावा लागतो. हीच बाब या प्रकारामुळे पुन्हा समोर आली आली आहे.

Web Title:  Police arrests policeman, three arrested: Kalyan incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.