शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ताणतणावातून पोलीस संपवताहेत जीवनयात्रा! पाच वर्षांत नऊ जणांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:32 IST

कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. मागील पाच वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील तीन महिला कर्मचाºयांसह नऊ जणांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे.

- पंकज रोडेकर ठाणे : कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. मागील पाच वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील तीन महिला कर्मचाºयांसह नऊ जणांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे.गतवर्षी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची धामधूम संपत नाही, तोच ठाणे शहर पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्या घटनेला एक वर्ष होत नाही, तोच बुधवार ६ सप्टेंबर रोजी महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार यांनी आत्महत्या केली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील परिमंडळ-१ आणि ५ या दोन परिमंडळांत ठाणे, मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाºयांसह ८ पोलिसांनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या केली आहे.कुटुंबांसह हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेले मुंबई पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी त्यांच्या खाजगी रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रस्ते अपघातात पाय गमावणारे ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस हवालदार भरत थोरात (५१) यांनी वर्तकनगर येथे स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. शहर मुख्यालयातील पोलीस टिपू सुलतान बालेखान मुल्लाने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. नौपाड्याचे पोलीस अच्युत शिंदे यांनी आजाराला कंटाळून गावी आत्महत्या केली. तत्पूर्वी, कळव्यातही अर्चना हिवरे या महिला कर्मचाºयाने रॉकेल ओतून पेटवून घेतले. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वैशाली पिंगट यांनीही पोलीस ठाण्यातच ९ एमएम पिस्टलने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती.शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या मुख्यालयात रात्रपाळीला असलेल्या कॉन्स्टेबल दिलीप सिंगनवार (२८) याने एसएलआरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. गतवर्षी गणेशोत्सवात शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सागर माळूजकर यानेही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मृत्यूशी झुंज देताना, त्याची प्राणज्योत मालवली होती.वेळीच मार्ग काढणे गरजेचेप्रत्येकाला ताणतणाव असतो. त्याचा अतिरेक झाल्याने एखादा टोकाची भूमिका घेण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी लहानातले लहान तणावाचे विषय मनात न ठेवता दुसºयांशी मनमोकळेपणाने चर्चा करून ते दूर करावेत आणि या तणावातून वेळीच मार्ग काढणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले.

टॅग्स :Policeपोलिस