शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

भाजपा आमदाराच्या शाळेची बससेवा घेण्यासाठी अन्य वाहनांवर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 9:40 PM

मिरा रोडच्या सेव्हन सक्वेअर अकॅडमी शाळेच्या बस व्यतिरिक्त विद्यार्थी घेऊन येणा-या अन्य वाहनांवर वाहतुक पोलिसांमार्फत कारवाई करायला लावली.

 मिरा रोड - मिरा रोडच्या सेव्हन सक्वेअर अकॅडमी शाळेच्या बस व्यतिरिक्त विद्यार्थी घेऊन येणा-या अन्य वाहनांवर वाहतुक पोलिसांमार्फत कारवाई करायला लावली. शिवाय व्हॅनची चावी काढुन घेतल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीच्या कार्यालयास घेराव घातला होता. तर विद्यार्थ्यांची वाहतुक करणारी ही वाहनं शासन निकषा प्रमाणे नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीसां कडे तक्रार केल्याचे भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी स्पष्ट केले.भाजपा आमदार नरेंद्र मेहता तथा कुटुंबियांशी सबंधित सेव्हन इलेव्हन कंपनी तसेच सेव्हन स्क्वेअर अकॅडमी ही शाळा आहे. सदर शाळेच्या स्कुल बस असल्या तरी त्या बस सेवेचे शुल्क न परवडणारया पालकांनी अन्य व्हॅन आदीचा पर्याय निवडला आहे.परंतु शाळेच्या बस व्यतीरीक्त विद्यार्थी वाहणारया व्हॅन विरोधात आ. मेहतांनी वाहतुक पोलीस निरीक्षक जगदिश शिंदे यांच्या कडे तक्रार केली होती. आमदारांची तक्रार आल्याने वाहतुक पोलीसांनी देखील गेल्या आठवड्यात ५ वाहनां विरोधात कारवाई देखील केली.दरम्यान सोमवारी आ. मेहतांनी एका विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यास आलेल्या बाहेरच्या व्हॅनची चावी काढुन घेतली. त्या वरुन पालक संतप्त झाले. मोठ्या संख्येने पालक शाळे बाहेर जमले. त्यांनी शाळे जवळील सेव्हन इलेव्हन च्या कार्यालयास घेराव घातला होता. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग देखील पोलीस पथकासह घटनास्थळी आले.या वेळी एका विद्यार्थ्याने सांगीतले की, मेहता यांनी येऊन व्हॅनची चावी काढत विद्यार्थ्यांना गुराढोरां सारखे कोंबले जाते म्हणत व्हॅनचालक महिलेशी अरेरावी केली. व्हॅनची क्षमता १४ विद्यार्थ्यांची होती अािण आम्ही १० च विद्यार्थी त्यात होते असे तो म्हणाला.मेहतांच्या शाळेची बस सेवा घ्या असे सांगीतले जाते. पण आम्ही घेत नाही. कारण ते जास्त पैसे घेतात तेही आधी द्यावे लागतात. शिवाय विद्यार्थ्याची जबाबदारी आमची नाही लिहुन घेतात. आम्हाला परवडते व सोयीचे वाटते त्या वाहनातुन आम्ही मुलांना पाठवतो. पण यांच्या दबावाखाली पोलीस प्रशासन पण आम्हाला धमकावत आहेत असा आरोप उपस्थित पालकांनी केला.दरम्यान आ. मेहता यांनी मात्र आपण शाळेची बस सेवा घेण्यासाठी कोणाही पालकांना सांगत नाही. विद्यार्थ्यांची वाहतुक करणारया शाळेच्या बस - वाहनां साठी शासनाचे निकष आहेत. त्याचे पालन केले जात नाही. विद्यार्थ्यांना जास्त संख्येने या वाहनां मधुन कोंबले जाते म्हणुन आपल्या निदर्शनास आले असता पोलीसां कडे तक्रार केल्याचे सांगीतले. चावी काढणे, महिलेस अरेरावीने बोलणे आदी प्रकारच घडला नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :SchoolशाळाMaharashtraमहाराष्ट्र