पोलीस शिपायाचे अपहरण करून मारहाण

By Admin | Updated: July 7, 2017 04:26 IST2017-07-07T04:26:33+5:302017-07-07T04:26:33+5:30

इंधन चोरीत गुंतलेल्या आरोपींनी बुधवारी एका पोलीस शिपायाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. पोलिसांनी ही कार जप्त केली असून, आरोपींचा

Police abducted and abducted | पोलीस शिपायाचे अपहरण करून मारहाण

पोलीस शिपायाचे अपहरण करून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : इंधन चोरीत गुंतलेल्या आरोपींनी बुधवारी एका पोलीस शिपायाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. पोलिसांनी ही कार जप्त केली असून, आरोपींचा तपशीलही मिळवला आहे.
कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दशरथ पवार हे बुधवारी भार्इंदर पाड्यामध्ये कर्तव्यावर असताना त्यांनी एक स्वीफ्ट डिझायर टॅक्सी संशयावरून थांबवली. टॅक्सीची पाहणी करीत असतानाच त्यांना तिघांनी कारमध्ये ढकलून गाडी सुरू केली. पवार यांना गायमुख भागातील शिवमंदिरापर्यंत आरोपींनी त्यांना मारहाण केली. नंतर चालत्या कारमधून त्यांना ढकलण्याचा प्रयत्नही आरोपींनी केला. कासारवडवली पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासामध्ये पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. तिघांपैकी एक आरोपी तुर्भे येथील असून, तो इंधन चोरीच्या गुन्ह्यात गुंतलेला आहे. यासंदर्भात त्याच्याविरुद्ध एक गुन्हाही यापूर्वी दाखल झालेला आहे. पोलिसांनी टॅक्सी जप्त केली असून, त्यामध्ये आठ रिकामे कॅन मिळाले आहेत. या कॅनमधून चोरीचे इंधन आरोपींनी आणले असून, त्याच कारणाने त्यांनी पवार यांना टॅक्सीची पाहणी करण्यास विरोध केला असावा, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Police abducted and abducted