शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

डोंबिवलीत रंगले महामानवांच्या विचारांचे कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 1:04 AM

ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांना वाहिली आदरांजली : स.है. जोंधळे हायस्कूलमध्ये झाला कार्यक्रम

डोंबिवली : महामानवांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्यांनी केलेल्या जनजागृतीचे महत्त्व नागरिकांना कळावे, हे उद्दिष्ट समोर ठेवून शनिवारी सायंकाळी येथील पश्चिमेकडील स.है. जोंधळे हायस्कूलमध्ये विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महामानवांच्या विचारांचे कविसंमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महामानवांच्या विचारधारेवर आधारित, स्वरचित कविता यावेळी सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत दिवंगत राजा ढाले यांना कवींच्या वतीने आदरांजलीही वाहण्यात आली.

चैतन्य सुखदेव सोनावणे फाउंडेशन ठाणे, बहुउद्देशीय मानवसेवा सामाजिक संस्था भिवंडी, कवी कट्टा ग्रुप कल्याण-मुंबई, माझी आई प्रतिष्ठान सामाजिक संस्था भिवंडी, स.सु.स. आणि लाख मोलाच्या कविता काव्यमंच कल्याण, विकास प्रबोधिनी संस्था भांडुप, मुंबई, रामवेणू काव्य मंच दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

संमेलनाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे होते, तर संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक जगदेव भटू, नवनाथ रणखांबे, विजयकुमार भोईर, सुरेखा गायकवाड, कवी दीप यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनात नवनाथ रणखांबे, जगदेव भटू, विजयकुमार भोईर, मिलिंद जाधव, कवी दीप, अशोक कांबळे, विष्णू खांजोडे, सुरेखा गायकवाड, मनीषा मेश्राम, प्रतिभा सोनावणे, वृषाली माने, उदय क्षीरसागर, चेतन जाधव, संघरत्न घनघाव, ज्योती गोळे, गणेश गावखडकर, कामिनी धनगर, शंकर घोगरे या कवींनी कविता सादर केल्या.अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. बलुतेदार-अलुतेदार, अठरापगड जातींना जोडून आणि सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. हिंदू-मुस्लिम, ब्राह्मणेतर वर्गाला सोबत घेऊन प्रत्येक सैनिकांना मावळा ही पदवी दिली. त्यामुळे महाराष्ट्र उभा राहिला. त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे महात्मा जोतिराव फुलेंनी भारतातील जातीय व्यवस्थेला छेद देऊन समस्त स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुले केली आणि आज भारतीय महिला स्वाभिमानाने जगत आहे.दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद जाधव यांनी केले, तर आभार कवी दीप यांनी मानले.

सर्व जातींना जोडणे आवश्यक - अ‍ॅड़ सोनावणेफुले आणि आंबेडकरांना जोडणारा दुवा राजर्षी शाहू महाराज होते. स्वत:च्या राज्यात ५० टक्के बहुजन समाजाला आरक्षणाची तरतूद करणारे खरे समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज होते. आरक्षणाला संविधानिक दर्जा देऊन संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रतिनिधित्व बहाल केले. देशात क्र ांती घडवून आणणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. या सर्वच महामानवांनी केलेला प्रचंड त्याग आणि त्यांच्या संघर्षाला जगात कुठेच तोड नाही. मानवमुक्तीच्या लढ्यातील प्रणेते आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन आज आम्ही सर्व जातीजातींना जोडून महामानवांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहोत. जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी, सर्व जातींना जोडणे आवश्यक आहे, याकडे सोनावणे यांनी लक्ष वेधले.