काँग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांविरोधात याचिका

By Admin | Updated: November 16, 2016 04:18 IST2016-11-16T04:18:36+5:302016-11-16T04:18:36+5:30

भिवंडी दिवाणी व फौजदारी न्यायालयात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेबाबत काँग्रेस कार्यकर्ते

Plea against two Congress leaders | काँग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांविरोधात याचिका

काँग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांविरोधात याचिका

भिवंडी : भिवंडी दिवाणी व फौजदारी न्यायालयात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेबाबत काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र यापूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधातही २०१३ मध्ये याचिका दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा देशात हिंदू दहशतवाद पसरविण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे घेत असल्याचा आरोप शिंदे यांनी २० जानेवारी २०१३ मध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिरात केला होता. या आरोपामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा व जातीय तेढ वाढण्याचा धोका संभवतो, असा आरोप करत मुरलीधर नांदगावकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देत भिवंडी न्यायालयात याचिका दाखल केली होती. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनीही शिंदे यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याने याचिकेत दोघांनाही आरोपी केले होते. परंतु शिंदे यांनी संसदेमध्ये माफी मागितल्याने भिवंडी न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.
२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य करत टीका केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Plea against two Congress leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.