शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

वर्तकनगरातील 'झेडपी'च्या मैदानावर रंगला आठवणींचा डाव, खेळाडूंकडून क्रिकेट रत्नाला अनोखी मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 11:15 AM

Thane : वर्तकनगर मधील सिनियर खेळाडूंच्या वतीने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २१ फेब्रुवारी १९७१ रोजी हा ग्राउंड रोलर मैदानात आणण्यात आला.

ठाणे: फुलांची सजावट, कस्टमाइज केक आणि जोडीला चविष्ट नाश्ता ही सर्व तयारी एखाद्या तरूणाच्या वाढदिवसाची नसून वर्तकनगर येथील 'झेडपी'च्या मैदानाची गेल्या ५० वर्षांपासून निगा राखणाऱ्या 'ग्राउंड रोलर'च्या सन्मान सोहळ्याची होती. आज रविवार असूनही या लाडक्या क्रिकेट रत्नाला अनोखी मानवंदना देण्यासाठी वर्तकनगरात आजी माजी खेळाडूंच्या आठवणीचा डाव याठिकाणी रंगला. ग्राउंड रोलरचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस जल्लोषात साजरा करताना आयुष्यातील अनेक भागीदारीचा किस्सा येथील खेळाडूंनी मांडला.

वर्तकनगर मधील सिनियर खेळाडूंच्या वतीने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २१ फेब्रुवारी १९७१ रोजी हा ग्राउंड रोलर मैदानात आणण्यात आला. आज त्याला ५० वर्षे पूर्ण झाली. हा रोलर जागचा हलविण्यासाठी सात आठ जणांची टीम लागते. गोलाकार लोखंडी आणि आतमध्ये सिमेंट काँक्रेट ठासून भरलेल्या या ग्राउंड रोलरने टेनिस क्रिकेटची पंढरी असलेल्या वर्तकनगरच्या मैदानाची नेहमीच निगा राखली. याच मैदानात सुनील गावस्कर, कार्सन घावरी, सलीम दुराणी, सचिन तेंडुलकर, इकबाल खान, रशीद पटेल या खेळाडूंचा खेळ ग्राउंड रोलरने पाहिला. तर हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अजित पवार यांच्या सभा देखील या रोलरने ऐकल्या आहेत. विशेष म्हणजे, जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याचा देखील हा रोलर साक्षीदार आहे.  

ज्येष्ठ खेळाडूंची 'बॅटिंग'वर्तकनगर म्हाडा वसाहतीला जवळपास साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या मैदानातून अनेक खेळाडू, डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, राजकारणी खेळून तयार झालेत. क्रिकेटमध्ये खेळाडूचा, प्रशिक्षकाचा, पंचाचा, ग्राउंडमनचा नेहमीच सन्मान केला जातो. मात्र वर्तकनगर येथील झेडपीच्या मैदानात प्रथमच ग्राउंड रोलरचा अनोखा सन्मान त्याच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ खेळाडू दाजी भगत, संदीप शिंदे , सुनील शिंदे , दर्शन भोईर ,अजित म्हात्रे,  श्रीकांत म्हात्रे, मनोहर मोरजकर, बबन राणे, भाई सावंत, नितीन सिंघेवर आदी उपस्थित होते. तर अजित इलेव्हन संघाचे संस्थापक अजित म्हात्रे यांनी केक कापून या सोहळ्याची सांगता केली. सुशिल सुर्वे, अभय अमृतकर यांनी कार्यक्रमाचे सुञसंचालन केले. या मैदानावर खेळलेले स्थानिक नगरसेवक विक्रांत चव्हाणही सोहळ्याला हजर होते. 

टॅग्स :thaneठाणे