स्मार्ट ठाण्यात खेळण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मैदानेच नाहीत

By Admin | Updated: February 14, 2017 02:41 IST2017-02-14T02:41:54+5:302017-02-14T02:41:54+5:30

ठाणे शहर स्मार्ट सिटीची पाऊले टाकत असली तरी क्रिडांगणे आणि उद्यानांसारख्या विषयांकडे पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. खेळाडू निर्माण

To play in Smart Thana, there are no grounds for cultural events | स्मार्ट ठाण्यात खेळण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मैदानेच नाहीत

स्मार्ट ठाण्यात खेळण्यासाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मैदानेच नाहीत

प्रज्ञा म्हात्रे / ठाणे
ठाणे शहर स्मार्ट सिटीची पाऊले टाकत असली तरी क्रिडांगणे आणि उद्यानांसारख्या विषयांकडे पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. खेळाडू निर्माण करणारी क्रिडांगणे आणि लहान मुलांचे मनोरंजन करणाऱ्या उद्यानांची आज अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. मुळात ठाण्यात क्रिडांगणे आणि उद्याने आहेत का? हा मोठा प्रश्न आहे. ठाण्यात अनेक नामवंत खेळाडू आहेत. परंतू त्यांना सरावासाठी चांगली मैदाने आणि सुविधा नसल्याने त्यांना सरावादरम्यान बऱ्याच अडणींना सामोरे जावे लागते.
याबाबत एकही लोकप्रतिनिधी आग्रही नसल्याची खंत खेळाडू आणि प्रशिक्षक वर्गातून व्यक्त होते आहे. चांगली क्रिडांगणे असतील तर आणखीन चांगले खेळाडू निर्माण होतील. प्रत्येक मैदानी खेळासाठी वेगवेगळी मैदाने असावीत अशा अपेक्षा खेळाडूंकडून व्यक्त होत
आहे.
एकीकडे लहान मुलांचे मनोरंजनाचे, करमणूकीचे मानले जाणाऱ्या उद्यानांना विकासाच्या नावाखाली वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या आहेत. शहरातील उद्याने ही असून नसल्यासारखी आहे. उद्यानांचा विकास व्हावा आणि ती लहान मुलांसाठी उपलब्ध व्हावीत याबाबत लोकप्रतिनिधी जागृत नाहीत असा आरोप समस्त पर्यावरण प्रेमींकडून होत आहेत.
पालिका निवडणूकीनंतर निवडून येणाऱ्या नगरसेवकाने रस्ते, पाणी यांशिवाय क्रिडांगणे आणि उद्यानांसारख्या विषयांकडेही आपले लक्ष वेधावे अशी माफक अपेक्षा समस्त ठाणेकरांकडून केली जात आहे.

Web Title: To play in Smart Thana, there are no grounds for cultural events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.