मुरबाड येथे वृक्षारोपण, छत्री वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:27 IST2021-07-11T04:27:04+5:302021-07-11T04:27:04+5:30

ठाणे : मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांनी माजी आमदार गोटीराम पवार यांचा वाढदिवस शनिवारी साजरा केला. यास अनुसरून तालुक्यातील विविध ठिकाणी ...

Plantation at Murbad, distribution of umbrellas | मुरबाड येथे वृक्षारोपण, छत्री वाटप

मुरबाड येथे वृक्षारोपण, छत्री वाटप

ठाणे : मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांनी माजी आमदार गोटीराम पवार यांचा वाढदिवस शनिवारी साजरा केला. यास अनुसरून तालुक्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम बरोबरच छत्री वाटप आणि शिवळे येथील महाविद्यालयासह विविध ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडले.

मुरबाड विधानसभा मतदारसंघातून पवार यांनी तब्बल चार वेळा निवडून आले होते. त्यांचा मुरबाड तालुक्यातील गावागावांमध्ये थेट संपर्क आहे. त्यांचे समर्थक, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि मित्र मंडळांकडून तालुक्यात वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमांना राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे, जनसेवा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष तानाजी देशमुख, ॲड. प्रमोद चौधरी, जिल्हा परिषदेच्या सदस्या प्राजक्ता भावार्थे, रेखा कंटे, किसन गिरा, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कांतिलाल कंटे, ज्येष्ठ नेते रामभाऊ दळवी, पांडुरंग कोर, प्रकाश पवार, भगवान भगत, चिमा शिद, मधुकर एगडे आदी उपस्थित होते.

...

Web Title: Plantation at Murbad, distribution of umbrellas