शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

आणखी सहा क्लस्टरचे आराखडे ठाणे पालिका महासभेच्या पटलावर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 01:27 IST

स्टेशन परिसराचा समावेश : आझादनगर, महागिरीचाही होणार विकास

n  लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  ठाण्यात आता खऱ्या अर्थाने क्लस्टर योजनेला गती मिळण्यास सुरुवात झाली असून पहिल्या सहा आराखड्यांना अंतिम मान्यता दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील सहा आराखडे अंतिम मान्यतेसाठी महासभेच्या पटलावर ठेवले आहेत. यामध्ये आझादनगर, गोकूळनगर, महागिरी, चरई, सिद्धेश्वर परिसर आणि ठाणे स्थानक परिसर या भागांचा समावेश आहे.धोकादायक इमारतींत वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांना हक्काचे घर मिळावे आणि त्यांच्या डोक्यावरील टांगती तलवार दूर व्हावी या उद्देशाने महापालिकेने शहरासाठी क्लस्टर योजना पुढे आणली आहे. तिच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने शहरातील विविध भागांचे एकूण ४४ नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार केले होते. त्याचे एकूण क्षेत्र १५०९ हेक्टर इतके असून ४४ पैकी कोपरी, राबोडी, टेकडी बंगला, लोकमान्यनगर, किसननगर आणि हाजुरी या सहा आराखड्यांचा समावेश आहे. या सर्वच भागांत महापालिकेने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले असून किसननगर आणि हाजुरी भागात तिचा उद्घाटन कार्यक्रम गेल्या वर्षी पार पडला. मात्र, कोरोनामुळे हे काम काहीसे थंडावले होते. असे असतानाच प्रशासनाने आता या कामाला पुन्हा गती दिली असून त्याचाच एक भाग म्हणून दुसऱ्या टप्प्यात शहराच्या विविध भागांतील या सहा आराखड्यांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील नागरिकांच्या हरकती आणि सूचना निकाली काढून या भागातील आराखड्यांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. दुसऱ्या टप्प्यातील आझादनगर भागाच्या आराखड्यासाठी एकही हरकत आणि सूचना प्राप्त झाली नसल्यामुळे त्यासाठी सुनावणी घेतली नाही. तर, गोकूळनगर १, महागिरी ३५५, चरई २७, सिद्धेश्वर १७, स्थानक परिसर ३७ हरकती आणि सूचना पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या सर्व सूचना आणि हरकतींवर प्रशासनातर्फे सुनावणी देण्यात आली आहे. 

काही बदलांची शक्यता महागिरी येथे अधिकृत इमारतीतील ७० टक्क्यांपेक्षा जास्त सदनिकाधारकांची सहमती नसल्यामुळे ते आराखड्यात कायम ठेवले आहे. चरई, स्थानक परिसर या आराखड्यांमध्ये गावठाण आणि कोळीवाडे वगळणेबाबत कोणत्याही सूचना व हरकती नसल्या तरी चरई, स्थानक परिसर आणि महागिरी या भागांतील दाटवस्तीचे क्षेत्र वगळण्याकरिता आराखड्यांच्या नियोजनात काही बदलांची शक्यता आहे. त्यामुळे या बदलांसह आराखड्यांना मंजुरी देण्याचे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका