शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पेपर कटिंग आर्टला ‘लिम्का,’ ‘इंडिया बुक’मध्ये स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:13 IST

शरद पाटील यांची कलाकृती; डोंबिवलीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा, मान्यवरांचे केले पोर्ट्रेट

- जान्हवी मोर्ये डोंबिवली : शहरातील कलाकार शरद पाटील यांनी ‘पेपर कटिंग आर्ट’ या आगळ्यावेगळ्या कलाकृतीला जन्म दिला. या कलाकृतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. यापूर्वीही त्यांच्या एका कलेची दखल ‘लिम्का बुक’ने घेतली आहे. पाटील यांच्या यशामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.डोंबिवलीत जन्मलेल्या पाटील यांचे शालेय शिक्षण पांडुरंग विद्यालयात झाले. चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसतानाही सातवीत असताना एका आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत ते ठाणे केंद्रातून प्रथम आले होते. काहीतरी वेगळे करण्याच्या भावनेतून त्यांनी चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. परंतु, प्रशिक्षण नसल्याने चित्रे रेखाटायची कशी, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. नियमित सराव आणि व्हिडीओ पाहून ज्ञानाच्या जोरावर त्यांनी ही कला आत्मसात केली. मान्यवरांची हुबेहूब चित्रे त्यांना साकारता येऊ लागली. त्या-त्या मान्यवरांना त्यांचे रेखाटलेले रेखाचित्र दाखवून ते त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊ लागले. त्यांच्या या छंदाचे रूपांतर एका संग्रहात झाले.नेते, अभिनेते, गायक, कवी, लेखक, खेळाडू, अशा विविध क्षेत्रांतील ८४५ मान्यवरांची रेखाटलेली रेखाचित्रे व स्वाक्षऱ्या त्यांच्याकडे आहेत. पाटील यांच्या संग्रहातील निवडक १६० चित्रांची निवड लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये २०१९ ला करण्यात आली. पाटील यांचे हे लिम्का बुकमधील पहिले रेकॉर्ड होते. त्यानंतर, त्यांनी वेगळे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच त्यांना पेपर कटिंग आर्ट ही कला सुचली. पेपर कटिंगद्वारे कलाकारांचे हुबेहूब चेहरे तयार करण्याच्या सरावाला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी नटसम्राट नाटकातील अभिनेता मोहन जोशी आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे पोट्रेट तयार केले. त्यावर त्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या. पहिल्या पोट्रेटनंतर पाटील यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी हॅम्लेट नाटकातील नायक सुमित राघवन यांची कलाकृती तयार केली. यावेळी त्यांची कलाकृती तयार करून त्यांना दाखवत असतानाच मनवा नाईक यांनी माझे पोट्रेट कुठे आहे, असे विचारले. त्यावर पाटील यांनी त्यांना नाटक संपेपर्यंत मिळेल, असे सांगून ते नाट्यगृहाबाहेर गेले. त्यानंतर त्यांनी नाटक संपायच्या आत त्यांचे पोट्रेट पूर्ण करून त्यांची स्वाक्षरी घेतली. त्यांनी आतापर्यंत २७५ हून अधिक मान्यवरांची पेपर कटिंग पोट्रेट तयार करून त्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. या कलाकृती नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यांनी २६८ पोर्ट्रेट, तर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने २७५ पोट्रेट निवडले आहेत.बिस्ट्स मोझेक पोट्रेटपाटील सध्या एका नवीन प्रकल्पावर काम करीत आहेत. बिस्ट्स (मणी) मोझेक पोट्रेट यामध्ये रंगीबेरंगी मणी वापरून कलाकृती तयार करीत आहेत.पाटील यांनी अशोक सराफ यांचे ४९०० मणी आणि प्रशांत दामले यांचे ४५९० मणी वापरून मोझक पोट्रेट तयार केले असून त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत.आपल्या कलेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी पाटील यांची इच्छा आहे. हे स्वप्न उराशी बाळगून ते अविरतपणे काम करीत आहेत.