शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांनी मोडले कंबरडे; वाहतूक मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:22 IST

दमदार पावसामुळे पुन्हा रस्त्यांची चाळण

कल्याण : शहरात पाच बळी गेल्यानंतर खडबडून जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने रस्त्यांतील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. परंतु, मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पुन्हा खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. त्याचबरोबर वाहतुकीचा वेग मंदावत असून ठिकठिकाणी कोंडी होत आहे. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांसाठी खड्डे डोकेदुखी ठरत असून भरपावसात ते बुजवायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.कल्याण शहर परिसरात यंदाच्या पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यातील दोन बळी पश्चिमेतील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या शिवाजी चौकात गेले आहेत. त्यामुळे सदोष रस्तेबांधणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पेव्हरब्लॉकमुळे काँक्रिट अथवा डांबरी रस्त्यांची पातळी समान राहत नाही. रस्त्यातील चढउतार अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तेच नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. पेव्हरब्लॉक खचल्याने शिवाजी चौक ते महंमदअली चौक या मार्गावर खड्डे पडल्याचे पाहावयास मिळत आहे.दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील आठवड्यापासून दमदार पुनरागमन केले आहे. हा पाऊस रस्त्यांच्या मुळावर आला असून बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले गेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, टिळकचौक, बाजारपेठ, लालचौकी, वायलेनगर, आग्रा रोड, दूधनाका, पारनाका, कासारहाट, घेलादेवजी चौक, संतोषीमाता रोड, रामबाग येथील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. डोंबिवली पूर्वेतील घरडा सर्कल ते टाटा पॉवर कंपनीदरम्यानचा न्यू कल्याण रोड, मंजुनाथ विद्यालय, टिळक चौक, ठाकुर्लीत चोळेगाव, ९० फुटी रस्ता, रेल्वे समांतर रस्ता, पंचायत विहीर, छेडा रोड, मानपाडा रोड, गांधीनगर, पश्चिमेतील महात्मा फुले रोड, सुभाष रोड, शास्त्रीनगर, भागशाळा मैदान, बावनचाळ,कोपर उड्डाणपूल परिसर आदी ठिकाणी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.डोंबिवलीतील एमआयडीसी निवासी भागातील रहिवासीही तेथील खड्ड्यांनी पुरते बेजार झाले आहेत. खड्डेबळींनंतर केडीएमसी मुख्यालयावर मनसेने ‘चले जाव’ मोर्चा काढला होता, तर शहरात पूर्वेकडील भागात पडलेल्या खड्ड्यांची लाज वाटावी, यासाठी तेथील प्रभाग अधिकाºयांना मनसेने लाजाळूचे झाड भेट दिले होते. खड्डे वेळीच न बुजवल्यास पुढच्या वेळेस अधिकाºयांना खड्ड्यांत लोळवू, असा इशाराही मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. पाच बळी गेल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महापालिका अधिकाºयांची खरडपट्टी काढली होती. त्यानंतर, खड्डे बुजवण्याची कामे हाती घेण्यात आली. बहुतांश खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असताना पुन्हा सुरू झालेल्या दमदार पावसामुळे खड्डे पडले आहेत.गणपतीचे आगमन खड्ड्यांतूनच?गणेशोत्सव दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. जर पाऊस असाच सुरू राहिला, तर गणपतीचे आगमन खड्ड्यांतूनच होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी महापालिकेला येत्या काही दिवसांत युद्धपातळीवर खड्डे बुजवावे लागणार आहेत. त्यामुळे महापालिका अधिकाºयांची डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :Potholeखड्डेthaneठाणे