लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : विदेशी बनावटीचे पिस्टल बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी मनीष आप्पा पाटील (२८, रा. चिंचवली गाव, ता. भिवंडी) याला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्याच्याकडून एक विदेशी बनावटीचे पिस्टल आण िदोन जिवंत काडतुसे असा ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.भिवंडी येथील धामणनाका परिसरात एक व्यक्ती पिस्टल कंबरेला लावून फिरत असल्याची माहिती ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक महेश सागडे, जमादार चंद्रकांत पोशिरकर, हवालदार मनोहर तावरे, रवींद्र चौधरी आण िधनाजी कडव आदींच्या पथकाने धामणनाका भागात २७ आॅगस्ट रोजी रात्री ११.५५ वाजण्याच्या सुमारास सापळा लावून मनीष या संशियताला ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये त्याच्याकडे एक विदेशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागडे हे अधिक तपास करीत आहेत.
पिस्टल बाळगणाऱ्यास भिवंडीतून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 00:49 IST
विदेशी बनावटीचे पिस्टल बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी मनीष आप्पा पाटील (२८, रा. चिंचवली गाव, ता. भिवंडी) याला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिस्टल बाळगणाऱ्यास भिवंडीतून अटक
ठळक मुद्देविदेशी बनावटीचे पिस्टल हस्तगतदोन काडतुसेही जप्त