मुरबाडमध्ये पुन्हा बिबट्या
By Admin | Updated: February 7, 2017 04:10 IST2017-02-07T04:10:45+5:302017-02-07T04:10:45+5:30
पळू-सोनावळे परिसरात आॅगस्ट महिन्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वन विभागाने ठार केल्यानंतरही त्या बागात बिबट्याचा संचार असल्याचा दावा

मुरबाडमध्ये पुन्हा बिबट्या
मुरबाड : पळू-सोनावळे परिसरात आॅगस्ट महिन्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वन विभागाने ठार केल्यानंतरही त्या बागात बिबट्याचा संचार असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला होता. मात्र तेव्हा अस्तित्व न दाखवणाऱ्या बिबट्याने सहा महिन्यांनंतर पुन्हा संचार सुरू केला असून दोन दिवसांत तीन वासरे फस्त केली आहेत. आता त्याचा वावर सरळगाव परिसरात आहे. फटाके फोडून बिबट्याला पळवून लावावे, असा सल्ला वन विभागाने दिला आहे.
जुन्नरच्या पट्ट्याला मुरबाडचा डोंगराळ भाग लागून आहे. तेथे जंगलात सोडलेले बिबटे फिरत या भागात येतात. वृक्षतोडीमुळे येथील जंगले विरळ झाल्याने भक्ष्याच्या शोधात ते लोकवस्तीत येतात, असा गावकऱ्यांचा अंदाज आहे. अवघ्या सहा महिन्यात वेगळ््या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने तेथील गाव-पाड्यांत दहशत पसरली आहे.
सोनावळे येथील बारकू भोईर यांच्यावर हल्ला करून त्यांच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याने तो बिबट्या नरभक्षक असल्याचे जाहीर करून वन विभागाने त्याला ठार मारण्यासाठी मोहीम उघडली होती. त्यासाठी ठिकठिकाणी पंजरे, मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. ही मोहीम बरीच गाजली. बिबट्याला ठार मारण्याच्या आदेशामुळे ती चचर््ोतही आली. त्यानंतर बिबट्याला ठार मारण्यात यश आले खरे, पण अवघ्या दोनच दिवसात पुन्हा बिबट्याचे ठसे आढळून आल्याने गावकऱ्यांतील भय संपले नव्हते. त्यानंतर साधारणत: सहा महिने बिबट्याने दर्शन दिले नव्हते. त्याचा वावर असल्याच्या खुणाही सापडल्या नव्हत्या.
जुन्नर पट्ट्यात सापडलेले बिबटे माळशेज घाट परिसर व पुणे जिल्ह्यातील जंगल परिसरात फिरत असल्याची माहिती सतत सांगितली जाते. मुरबाड तालुक्यात वन हद्दीतील झाडांची चोरटी तोड मोठी आहे. त्याखेरीज समिधांसाठीही बेसुमार झाडे, झुडपे तोडली जात आहेत. जंगलपट्टी, वृक्ष विरळ झाल्याने तेथील वन्यप्राणी अन्न-पाण्यासाठी गाव-वस्तीकडे भक्ष्याच्या शोधात येतात.
आता सरळगाव परिसरात सापडलेल्या बिबट्याने नवापाडा येथील वसंत एगडे यांच्याकडील दोन वासरे व आणखी एका शेतकऱ्याचे एक वासरू दोन दिवसात फस्त केली. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. बिबट्यापासून संरक्षणासठी फटाके वाजवण्याचा सल्ला वनविभागाने ग्रामस्थांना दिला आहे. (वार्ताहर)