शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

ठाण्यामध्ये रेखाटले गजानन महाराजांचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 3:08 AM

ठाणे : फेब्रुवारी महिन्यात येऊ घातलेल्या गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त ठाण्यातील गजानन महाराजांच्या मठात सुप्रसिद्ध चित्रकार सदाशिव कुलकर्णी व त्यांच्या टीमने ८ बाय ४० फुटांचे शेषशायी गजानन महाराजांचे चित्र रेखाटले आहे.

ठाणे : फेब्रुवारी महिन्यात येऊ घातलेल्या गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त ठाण्यातील गजानन महाराजांच्या मठात सुप्रसिद्ध चित्रकार सदाशिव कुलकर्णी व त्यांच्या टीमने ८ बाय ४० फुटांचे शेषशायी गजानन महाराजांचे चित्र रेखाटले आहे. या भव्य चित्रात गजानन महाराजांचे २१ अध्याय त्यांनी दाखविले आहे. हे मनमोहक चित्र येत्या गुरूवारपासून सर्व भक्तांना पाहता येणार आहे.राम मारुती रोड येथे गेल्या ३९ वर्षांपासून गजानन महाराजांचे प्रसिद्ध मठ आहे. ज्येष्ठ चित्रकार कुलकर्णी हे गेल्या सहा वर्षांपासून महाराजांच्या प्रगट दिन जवळ आला की त्याच्या आसपासच्या कालावधीत नेत्र दिपून टाकणारे भव्यदिव्य चित्र रेखाटत असतात. आतापर्यंत त्यांनी त्यांचे एकेक अध्याय दाखविले आहेत. गेल्या वर्षी २१ अध्याय त्यांनी काढले होते. यंदा काहीतरी नविन चित्र काढावे अशी संकल्पना कुलकर्णींच्या डोक्यात होती. नेमके काय काढावे यावर त्यांनी काही दिवस विचारमंथन केले. शेषाशायी गजानन महाराज असे चित्र कुठेही नाही, त्यामुळे हे आगळे वेगळे चित्र महाराजांच्या भक्तांसमोर आणावे यासाठी त्यांनी एका कागदावर हे स्केच काढले आणि तीन दिवसांत त्यांनी मठाच्या मागील भिंतीवर हे चित्र रेखाटले. यात त्यांनी नागावर पहुडलेले महाराज दाखविले आहे. त्यांच्या अंगावर २१ अध्यायांची चित्रे दाखविली आहेत, चेहºयाभोवती प्रभामंडळ दाखविले आहे. समुद्रातील पाण्यात कासव, मासे, मगर त्यांनी दाखविले आहे. बाजूलाच ते लक्ष्मी यंत्र देखील काढणार असल्याचे सांगितले. या चित्रासाठी ११ रंगांचा वापर झाला असून पाच हजाराचे रंग वापरल्याचे कुलकर्णी म्हणाले. शनिवारी चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. मंगळवारी पूर्ण झाले आहे. स्वाती मोदगी, आदित्य कानडे, प्रिती घोंगडी, प्राची पाटणकर यांचा हातभार लागला.>मठाच्या मागील भिंत ही मोकळीच असते. ती भिंत मोकळी न राहता त्यावर कल्पनाचित्र रेखाटले जावे अशी संकल्पना होती. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून या भिंतीवर चित्र काढले जाते.- विनय जोशी, संस्थापक, गजानन महाराज मठ