शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

ठाण्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट : युती-आघाडीसह मनसेत सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2019 01:36 IST

शहरातील ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मुंब्रा-कळवा या चारही मतदारसंघांचे गणित अर्ज दाखल झाल्यानंतर स्पष्ट झाले.

ठाणे : शहरातील ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मुंब्रा-कळवा या चारही मतदारसंघांचे गणित अर्ज दाखल झाल्यानंतर स्पष्ट झाले. ठाणे शहरात भाजप विरुद्ध मनसे आणि राष्टÑवादी, मुंब्रा-कळवामध्ये राष्टÑवादी विरुद्ध शिवसेना, कोपरी पाचपाखाडीमध्ये पालकमंत्री विरुद्ध काँग्रेस आणि मनसे, तर ओवळा-माजिवडा मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे.ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा संजय केळकर यांच्यावर विश्वास दाखविला आहे. तर, राष्टÑवादीकडून सुहास देसाई आणि मनसेकडून अविनाश जाधव हे आता निवडणूक रिंगणात आले आहेत. त्यामुळे खरी लढत आता या तिघांमध्ये होणार आहे. शिवसेनेची काही मंडळी जरी केळकर यांच्यासोबत असली, तरी काहींची नाराजी अजूनही कायम आहे. तसेच भाजपमधीलदेखील काही इच्छुक हे विरोधात काम करतील, अशी धाकधूक आहे. त्यामुळे याचा फायदा मनसे की राष्टÑवादीला होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे या मतदारसंघात कांटें की टक्कर होणार की एकतर्फी, हे पाहणे महत्त्वाचेठरणार आहे.ओवळा-माजिवडात शिवसेना विरूद्ध काँग्रेस सामना रंगणारओवळा-माजिवडा मतदारसंघातून स्वकीयांचा विरोध पचवून शिवसेनेकडून प्रताप सरनाईक हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. स्वकीयांची नाराजी दूर झाल्याचा दावा ते करीत असले, तरी धाकधूक अद्यापही कायम असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, तर मनसेकडूनही वर्तकनगरातील संदीप पाचंगे यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी चव्हाण आणि पाचंगे यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. लोकसभा निवडणूक न लढल्यामुळे मनसे या ठिकाणी तितकासा प्रभाव टाकेल, असे सध्या तरी चित्र नाही. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणे अपेक्षित आहे.कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्याविरोधात काँग्रेसने सुरुवातीला हिरालाल भोईर यांचे नाव अंतिम केले होते. मात्र, त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने अखेर शिंदे यांचे विरोधक समजले जाणारे संजय घाडीगावकर यांनाच गळ घालून त्यांना काँग्रेसने तिकीट दिले. या मतदारसंघात क्लस्टर मुद्दा येत्या काळात चांगलाच गाजणार असल्याचे चित्र आहे.मुंब्रा-कळवा मतदारसंघाच्या बाबतीतही अशीच काहीशी परिस्थिती दिसून आली होती. शिवसेनेकडे इच्छुकांची भाऊगर्दी असतानाही त्यांच्यावर विश्वास न ठेवता अखेरच्या क्षणी दीपाली सय्यद या मराठी अभिनेत्रीला शिवसेनेने उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणे