शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रद्दी साहित्यावरून पेटला वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:26 IST

मराठी साहित्य क्षेत्रातील समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी अंबाजोगाई येथील मराठवाडा विभागीय साहित्य संमेलनात हल्ली प्रकाशित होणा-या पुस्तकांपैकी ८० ते ९० टक्के पुस्तके किलोच्या भावाने रद्दीत विकण्याच्या लायकीची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले.

ठाणे : मराठी साहित्य क्षेत्रातील समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी अंबाजोगाई येथील मराठवाडा विभागीय साहित्य संमेलनात हल्ली प्रकाशित होणा-या पुस्तकांपैकी ८० ते ९० टक्के पुस्तके किलोच्या भावाने रद्दीत विकण्याच्या लायकीची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. मराठी सारस्वतात या विधानाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात पडसादही उमटले नाहीत इतके आपले लेखक, साहित्यिक, समीक्षक गोठून बर्फाचे गोळे झाले आहेत. ‘लोकमत’ने मराठीमधील दोन नामांकित प्रकाशकांना या विषयावर जाणीवपूर्वक बोलते केले...समीक्षकांनी ‘मृत्युंजय’, ‘ययाती’लाही नाकं मुरडली होती-अशोक कोठावळे,(मॅजेस्टीक प्रकाशन)वाचन हे व्यक्तीनुरूप बदलत असते. समीक्षकांना वाटते तेच साहित्य असते का? तर या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’, असे आहे. प्रसिद्ध होणारी ८० ते ९० टक्के पुस्तके रद्दीत किलोच्या भावाने विकण्याच्या लायकीची असतात, असे समीक्षक, लेखक पाटील यांचे मत आहे. ८० ते ९० टक्के हे मोठे प्रमाण झाले. मग शिल्लक काय राहतं?वाचक घडवणे आवश्यक आहे आणि वाचक घडवण्यासाठी पुस्तके निर्माण व्हावी लागतात, नवनवीन साहित्य निर्माण व्हायला हवे. एक व्यक्ती असे ठरवू शकत नाही. सर्व पुस्तकांचे साहित्य निर्माण व्हावे, लोकप्रिय साहित्य निर्माण व्हावे. चेतन भगतला मराठी समीक्षकांची मान्यता मिळणारच नाही; पण त्याच्या साहित्याची तरुणांना गरज आहे. साहित्य निर्मिती न झाल्यास वाचन संस्कृती लयाला जाईल. मृत्युंजयलाही समीक्षकांची मान्यता मिळाली नव्हती. लोकप्रिय साहित्य समीक्षकाला आवडेलच असे नाही आणि समीक्षकाला आवडलेले साहित्य लोकप्रिय होईलच, असे नाही. ‘ययाती’वरही मोठी टीका झाली होती. परंतु लोकप्रिय साहित्य निर्मितीची साहित्य व्यवहाराला गरज आहे. समीक्षकांच्या दृष्टीने ते टाकाऊ असू शकते. लेखन ही स्फूर्ती असते ते आतून येत असते. मान्यवर लेखकांप्रमाणे नवोदित लेखकांचीही पुस्तके येत असतात. पाटील यांच्या विधानामुळे प्रकाशकांच्या पुस्तक निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले नाही. त्यांचे विधान त्यांच्यापुरते आहे. याने साहित्य व्यवहारावर काहीही परिणाम होणार नाही.नव्या कवी, लेखक कितीही टीका झाली तरी त्यांचे लिखाण थांबणार नाही. जे स्फुरतं तो ते लिहिणारच. समीक्षक त्याला काय म्हणतील हा नंतरचा मुद्दा आहे. बºयाच समीक्षकांनी अशी विधाने केली आहेत. तरीही नवीन लेखक नाऊमेद होणार नाहीत.प्रकाशन संस्था आपले निकष बाळगून वेगवेगळ्या प्रकारांची पुस्तके प्रकाशित करीत असतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा आमच्यावर फारसा परिणाम होणार नाही, तसा संबंधच नाही. प्रत्येक प्रकाशन संस्थेचे स्वत:चे लेखकही असतात.नवलेखकांना नाउमेद करू नये-- अमोल नाले, (अनघा प्रकाशन)समीक्षकांची मतं ही वेगवेगळी असू शकतात. चंद्रकांत पाटील यांनी कोणती पुस्तके वाचून हे मत बनवले मुद्दा आहे. त्यांच्या विधानाने वाद वाढू शकतात. त्यांच्याकडे कोणती पुस्तके आहेत याची पडताळणी करायला हवी. त्यांनी अंबाजोगाईला झालेल्या मराठवाडा विभागीय संमेलनात केलेले विधान हे नवीन लेखकांना नाउमेद करणारे आहे. उलटपक्षी पाटील यांनी नवीन लेखकांना उमेद देण्याची गरज आहे. नवीन लेखकांचे लेखन हे उत्तम आहे यात वाद नाही. नवीन लेखकांना पुरस्कारही मिळाले आहेत. प्रकाशक पुस्तके प्रकाशित करताना ते वाचून. पुस्तक समाजाला कसे उपयुक्त ठरेल, याचा विचार केला जातो. प्रकाशक हा पुस्तकांचे मूल्य जाणतो. निकृष्ट दर्जाच्या पुस्तकांचे प्रस्ताव येत असतात पण तो विषय फार महत्त्वाचा वाटत नाही. प्रकाशक जे छापतो ते समाजोपयोगी असते. त्यातून पुढची पिढी घडावी हा उद्देश डोळ््यासमोर असतो. चांगले वाचन असेल तर पुढची पिढीही चांगली घडते. शहर, ग्रामीण भागांतील पुस्तकांचा दर्जा अजिबात घसरलेला नाही. ग्रामीण भागांतून भरपूर लेखक तयार झाले आहेत, ते चांगले लिहितात.