At Petrol Pump, a woman who requested not to use mobile phones was beaten | पेट्रोलपंपावर मोबाइल न वापरण्याची विनंती करणाऱ्या तरुणीला मारहाण

पेट्रोलपंपावर मोबाइल न वापरण्याची विनंती करणाऱ्या तरुणीला मारहाण

उल्हासनगर : पेट्रोल भरताना मोबाइल बंद ठेवण्याची विनंती केल्याने राग आलेल्या तरु णाने पेट्रोल भरणाºया तरुणीला शिवीगाळ करून मारहाण केली. बुधवारी, शिवजयंतीच्या दिवशी उल्हासनगरातील भारत पेट्रोलपंपावर रात्री ९ वाजता ही घटना घडली.

उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील भारत पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याचे काम मुली करतात. बुधवारी एक तरुण येथे पेट्रोल भरण्यासाठी आला होता. गाडीत पेट्रोल भरताना तरु ण मोबाइलचा वापर करीत होता. त्यावेळी पेट्रोल भरणाºया तरु णीने पेट्रोल भरताना मोबाइल बंद ठेवण्याची विनंती केली. त्याचा राग येऊन तरुणाने तिच्या कानाखाली मारून अश्लील शिवीगाळ केली. यावेळी पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी तरु णाला समज दिली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.

Web Title:  At Petrol Pump, a woman who requested not to use mobile phones was beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.