पेट्रोलपंप घोटाळा प्रकरण; तंत्रज्ञाची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:28 IST2017-09-24T00:28:40+5:302017-09-24T00:28:51+5:30
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटके त असलेला दुसरा खासगी तंत्रज्ञ (टेक्निशिअन) डंबरूधर मोहंतो यालाही कल्याण सत्र न्यायालयाने शुक्रवारी संध्याकाळी न्यायालयीन कोठडी सुनावली.

पेट्रोलपंप घोटाळा प्रकरण; तंत्रज्ञाची न्यायालयीन कोठडीत रवानगी
ठाणे : पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटके त असलेला दुसरा खासगी तंत्रज्ञ (टेक्निशिअन) डंबरूधर मोहंतो यालाही कल्याण सत्र न्यायालयाने शुक्रवारी संध्याकाळी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याने दिलेल्या माहितीनुसार ठाणे पोलिसांचे एक पथक ओडिशाला रवाना झाले आहे.
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर तंत्रज्ञ आहिरे याच्यापाठोपाठ ओडिशातून मोहंतो याला १३ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. त्याचदरम्यान, त्याने ओडिशातील २२ पंपांची माहिती दिली होती. त्यामध्ये एक पेट्रोलपंप नक्षलग्रस्त भागात आहे. त्यानुसार, पोलीस ओडिशाला रवाना झाले आहेत. शुक्रवारी पुन्हा त्याला न्यायालयात नेल्यावर न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींचा आकडा आता २९ वर गेला आहे. तंत्रज्ञ मोहंतो आणि रोह्यातील पेट्रोलपंपमालक दुबे हे दोघे वगळता या महिन्यात अटक केलेल्या पाच जणांविरोधात लवकरच आणखी एक पुरवणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.