उल्हासनगर गुन्हे शाखेची कामगिरी, ३२ लाख ३० हजाराचे एमडी ड्रग्ससह एकाला अटक
By सदानंद नाईक | Updated: August 22, 2025 18:40 IST2025-08-22T18:39:52+5:302025-08-22T18:40:28+5:30
उल्हासनगर गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमीदारा मार्फत ऐक जण अंमली पदार्थ विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती.

उल्हासनगर गुन्हे शाखेची कामगिरी, ३२ लाख ३० हजाराचे एमडी ड्रग्ससह एकाला अटक
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहर गुन्हे अन्वेषन पथकाने ३२ लाख ३० हजार ४०० रुपये किंमतीचे एकूण १६१ ग्रॅम वजनाचे एमडी हा अंमली पदार्थासह एकाला १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी अटक केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अन्वेषक्ण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी दिली.
उल्हासनगर गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमीदारा मार्फत ऐक जण अंमली पदार्थ विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता अन्वेक्षण विभागाच्या पथकाने पालेगाव, दर्गा जवळ अंबरनाथ पूर्व येथे सापळा रचला. यावेळी आलेल्या एका संशियित इसमावर पथकाने, धाड टाकून त्याची अंगाझडती घेतली असता त्याच्याकडे एमडी हा अंमली पदार्थ मिळून आला. इसमाचे नाव फरहान हबीब चौधरी असे असून तो यशवंतराव चव्हाणनगर, साईबाबा मंदिराजवळील चाळ, मानखुर्द, मुंबई येथे राहणारा आहे. ३२ लाख ३० हजार ४०० रुपये किंमतीची एकूण १६१ ग्राम वजनाचे एमडी (मेफेड्रॉन )या अंमली पदार्थसह मोबाईल फोन अन्वेक्षण विभागाने जप्त केला.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी अहमद कुरेशी याचा शोध घेत पोलीस घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत सावंत, गणेश गावडे, योगेश वाघ, रितेश वंजारी, राजेंद्र थोरवे, विक्रम जाधव, अविनाश पवार आदींनी सहभाग घेतला आहे.