पेंडक्याचीवाडीला अखेर सुरू झाला टॅँकर
By Admin | Updated: March 14, 2017 01:31 IST2017-03-14T01:31:35+5:302017-03-14T01:31:35+5:30
धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायत तीच्या अंतर्गत येणाऱ्या पेंडक्याचीवाडी येथील आदिवासींनी टॅँकरची मागणी करुनही गेल्या दोन महिन्यांपासून तिच्याकडे जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत

पेंडक्याचीवाडीला अखेर सुरू झाला टॅँकर
रवींद्र साळवे, मोखाडा
धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायत तीच्या अंतर्गत येणाऱ्या पेंडक्याचीवाडी येथील आदिवासींनी टॅँकरची मागणी करुनही गेल्या दोन महिन्यांपासून तिच्याकडे जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असे वृत्त लोकमतने रविवारच्या अंकात प्रसिद्ध करताच जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन तातडीने टॅँकर सुरू केला.
याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून लोकमतला धन्यवाद दिले आहेत. होळीच्या मुहूर्तावरच सायंकाळी टॅँकर आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गावाला ही होळीची भेट दिली अशी प्रतिक्रियाही आदिवासींनी व्यक्त केली. डिसेंबर पासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना देखील जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दीर्घ प्रतिक्षा करूनही भीषण पाणीटंचाईत पेंडक्याचीवाडीला टँकरने पाणीपुरवठा करण्यात आलेला नसल्याने येथील आदिवाशींचे तोंडचे पाणी पळाले होते परंतु याबाबत लोकमतने गेल्या महिनाभरात वारंवार वृत्ते प्रसिद्ध केलीत. १३ प्रस्तावांपैकी १२ प्रस्तवांना मान्यता देऊन नेमका हाच प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने प्रलंबित ठेवला होता. तहानबळी गेल्यावरच कुंभकर्णी निद्रेत असलेले जिल्हाधिकारी व त्यांचे प्रशासन जागे होणार काय? असा प्रश्न उपस्थित करणारे वृत्त रविवारी प्रसिद्ध होताच ही कुंभकर्णी निद्रा भंग पावली.
येथील भूमीपुत्राना डिसेंबर पासून घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते. विहिरीमधील असलेला पाणी साठा डिसेंबर मध्येच तळ गाठत असल्याने येथील महिला पुरु षांना विहिरीवरच मुक्काम ठोकून रात्रभर नंबर लाऊन आळीपाळीने विहिरीत उतरून पाणी भरावे लागत आहे अशी गंभीर परिस्थिती येथील आहे.