रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर लावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:27 IST2021-07-02T04:27:21+5:302021-07-02T04:27:21+5:30

ठाणे : अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुरुवारी संदीप माळवी यांनी कोपरी, नौपाडा भागात विविध कामांचा पाहणी दौरा केला. ...

Penalty imposed on street litter | रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर लावला दंड

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर लावला दंड

ठाणे : अतिरिक्त आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुरुवारी संदीप माळवी यांनी कोपरी, नौपाडा भागात विविध कामांचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर दंड ठोठावून रस्त्याकडेला पडलेल्या झाडाच्या फांद्या उचलण्याबरोबर ज्या ज्या ठिकाणी खडडे पडले असतील ते बुजविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.

या पाहणी दौऱ्यात नौपाडय़ात एका ठिकाणी रस्त्यावर कचरा टाकलेला दिसला. ज्याने तो टाकला होता. त्याला जागीच दंड ठोठावून यापुढे कचरा रस्त्यावर न टाकण्याची ताकीद दिली. तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे तत्काळ बुजविण्याचे आदेश दिल्यानंतर या भागातील रस्त्यावर पडलेले खड्डे तत्काळ भरण्यात आले. याशिवाय झाडांच्या फांद्यादेखील अनेक ठिकाणी पडलेल्या दिसून आल्या. त्यादेखील तत्काळ उचलण्याचे आदेश त्यांनी दिले. याशिवाय संबंधित विभागाला रस्ते साफसफाई करण्याबरोबर इतर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Penalty imposed on street litter