शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आमदार जयंत पाटलांकडून पॉईंटमन मयूर शेळकेंचा सन्मान, धनादेशही दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 16:46 IST

खेडेगावात राहणार्‍या मयुर शेळके यांचे जगभरात सर्वांनीच कौतूक केले. मुख्यमंत्री यांच्यासह मंत्री, खासदार, आमदारांपासून सर्वंच हितचिंतक नातेवाईकांनी मयुरचे कौतुक केले होते

ठळक मुद्देशेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी देखील मयुरचे फोन करून कौतुक केले होते. कर्जतमध्ये आल्यावर नक्कीच भेटून तुझ्या या शौर्याचा सन्मान करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले होते. 

कांता हाबळे                                                                                                                                                   

नेरळ - कर्जत तालुक्यातील तळवडे गावात राहणारा रेल्वे पॉइंट्समन मयुर शेळेके यांनी १७ एप्रिल रोजी वांगणी रेल्वे स्थानकात स्वःताचा जीव धोक्यात टाकून एका ६ वर्षांचा मुलाचा जीव वाचवला होता. शेकापचे सरचिटणीस आमदार जंयत पाटील यांनी बुधवारी 50 हजार रुपयांचा धनादेश देत मयूरच्या शौर्याला सलाम केला.

खेडेगावात राहणार्‍या मयुर शेळके यांचे जगभरात सर्वांनीच कौतूक केले. मुख्यमंत्री यांच्यासह मंत्री, खासदार, आमदारांपासून सर्वंच हितचिंतक नातेवाईकांनी मयुरचे कौतुक केले होते. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी देखील मयुरचे फोन करून कौतुक केले होते. कर्जतमध्ये आल्यावर नक्कीच भेटून तुझ्या या शौर्याचा सन्मान करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले होते. बुधवार ९ जून रोजी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे कर्जतमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मयुर शेळके याची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. मयूरला शाल, पुष्पगुच्छ आणि ५० हजारांचा धनादेश देवून त्याच्या धाडसाचा सन्मान करत पाठीवर शाबासकीची थाप दिली. याप्रसंगी शेकाप नेते विलास थोरवे, माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे, पुरोगामी युवक संघटचे कर्जत तालुका अध्यक्ष वैभव भगत, उपाध्यक्ष अनिल जोशी, खजिनदार महेश म्हसे, राजन विरले, दिलीप शेळके आदी शेकाप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :Mumbaiमुंबईrailwayरेल्वेMLAआमदार