शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
4
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
5
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
6
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
7
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
8
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
9
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
10
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
11
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
12
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
13
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
14
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
15
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
16
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
17
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
18
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
19
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
20
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू

CoronaVirus News : अनामत रक्कम भरा, नंतरच दाखल व्हा, मनसेचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 01:00 IST

पालिकेच्या कोविड रुग्णालयात पुरेसे बेड असल्याचे महापालिका आयुक्त समीर उन्हाळे यांनी सांगितले.

सदानंद नाईक उल्हासनगर : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोन दिवसापूर्वी उद््घाटन झालेल्या साई प्लॅटिनम रुग्णालयात अनामत रक्कम भरल्याशिवाय रुग्णांना दाखल केले जात नसल्याचा आरोप मनसेनेने केला. अनामत रक्कम घेणे बंद झाले नाहीतर मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला. दरम्यान, पालिकेच्या कोविड रुग्णालयात पुरेसे बेड असल्याचे महापालिका आयुक्त समीर उन्हाळे यांनी सांगितले.उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्वरित उपचार मिळण्यासाठी कॅम्प नं -३ मध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयालनी, महापौर लीलाबाई अशान, आयुक्त उन्हाळे, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया आदींच्या हस्ते खाजगी संस्थेच्या व महापालिकेच्या मदतीने उभारलेल्या साई प्लॅटिनम रुग्णालयाचे उद््घाटन झाले. कोरोनाची लक्षणे असलेल्या व पॉझिटिव्ह रुग्णांवर येथे महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत उपचार केले जातील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.प्रत्यक्षात रुग्णांना दाखल करताना अनामत रक्कम मागत असल्याचा आरोप मनसेचे उपजिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी केला. हाताला काम नसलेल्या गोरगरिबांनी इतकी मोठी रक्कम कुठून आणावी, असा प्रश्न केला आहे. महापालिकेने उभारलेल्या रेड क्रॉस रुग्णालयात कोरोनाचे लक्षण असलेल्या रुग्णांना भरती करून त्यांचा स्वॅब अहवाल येईपर्यंत उपचार केले जाते. त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांना महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालयात हलविले जाते. मात्र, रेड क्रॉस येथे फक्त २५ खाटा असल्याने लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचार मिळत नाही. त्यामुळे उपचाराविना रुग्णांचे हाल होत आहेत.चौकटसाई प्लॅटिनमबाबत माहिती घेईनकोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर रेड क्रॉस रुग्णालयात उपचार केले जातात. तर कोरोना संशयित रुग्णांना टाटा आमंत्र इमारतीमध्ये क्वारंटाइन केले जाते. त्यांचा स्वॅब अहवालानंतर पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना कोविड रुग्णालयात दाखल केले जाते. साई प्लॅटिनम रुग्णालया ऐवजी नागरिकांनी पालिकेच्या कोरोना रुग्णालयात संशयित रुग्णांनी उपचारासाठी जावे, असे आयुक्त समीर उन्हाळे यांनी सांगितले. साई प्लॅटिनम रुग्णालयाबाबत पालिका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊ असे सांगितले.>उद््घाटनानंतरही रुग्णालय सुरू नाहीअंबरनाथ : पालिकेच्या वतीने तयार केलेल्या ७०० बेडच्या हॉस्पिटलचे दोन दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद््घाटन झाले. मात्र रुग्णालयात अद्यापही रुग्णसेवा सुरू झालेली नाही.डेंटल कॉलेजमध्ये हे रुग्णालय उभारले आहे. उद््घाटनानंतर रुग्णालय सुरू होणे अपेक्षित होते. मात्र रुग्णालयात काही तांत्रिक कामे शिल्लक राहिल्याने आणि स्वच्छतागृहाची कामे शिल्लक राहिल्याने रुग्णसेवा सुरू करण्यास विलंब होत आहे. रविवारी हे रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.भिवंडीत एकाच दिवसात ११७ रुग्णभिवंडी : भिवंडीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी ८१ नवे रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात ३६ नवे रुग्ण आढळले आहेत. शहर व ग्रामीण भागात एकूण ११७ नवे रुग्ण आढळले. भिवंडीत आतापर्यंत ८७५ रुग्ण आढळले असून त्यापैकी ४४८ रुग्ण बरे झाले आहेत, तर ६६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत ३८७ रुग्ण आढळले असून त्यापैकी १४७  रुग्ण बरे झाले आहेत. ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून २३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस