शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये ५९ वाहनांद्वारे घातली जाते गस्त! चोरट्यांवर वचक ठेवण्यासाठी १७२ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गस्तीची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 09:01 IST

प्रशांत माने कल्याण :   कल्याण परिमंडळ-३ मध्ये काही महिन्यांपासून घरफोड्या आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यरात्री ...

प्रशांत माने

कल्याण:  कल्याण परिमंडळ-३ मध्ये काही महिन्यांपासून घरफोड्या आणि वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मध्यरात्री चोरट्यांकडून बंद घरे लक्ष्य केली जात असताना दिवसाढवळ्याही घराचे कडी-कोयंडे उचकटून लाखोंची मालमत्ता लुटून नेली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चोरीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र, असे असले तरी वाढत्या घटना पाहता पोलिसांची गस्त सुरू आहे का?, अशी शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत ५९ वाहनांद्वारे गस्त घातली जात असून, गस्तीसाठी १७२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचे पोलिसांनी सांगितले.कल्याण-डोंबिवलीत घरे व दुकानांचे शटर उचकटून मुद्देमाल लंपास करणे, चोरी, दरोडा, सोनसाखळी चोरी अशा घटनांत वाढ झाली आहे. डिसेंबरमध्ये एका जवाहिऱ्याच्या दुकानात भरदिवसा शस्त्राच्या धाकाने चोरीचा प्रकार घडला होता. तर, आडीवलीत तीन दिवसांत ११ घरफोड्या झाल्या होत्या. त्यामुळे गस्तीवरच संशय व्यक्त झाला. लॉकडाऊनमध्ये गस्त मोठ्या प्रमाणात होती. त्यावेळी गुन्हे घटले होते. परंतु, आता गुन्ह्यांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.वाहनांवर असे ठेवले जाते नियंत्रण कल्याण परिमंडळ-३ मध्ये कल्याण, डोंबिवलीतील प्रत्येकी चार पोलीस ठाणी आहेत. पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरिक्षकांसह दोन्ही शहरांतील सहायक पोलीस आयुक्त आणि परिमंडळाच्या पोलीस उपायुक्तांतर्फेही गस्त घातली जात आहे. आरएफआयडी प्रणालीद्वारे गस्त घातल्याची नोंद केली जात आहे. कल्याण परिक्षेत्रात अशी २६ यंत्र लावली आहेत. तसेच दर दोन तासांनी गस्त घातली जाते.

अनलॉकमध्ये गस्त झाली कमीकोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये पोलिसांची दिवस-रात्र गस्त दिसून येत होती. परंतु, अनलॉक सुरू झाल्यापासून गस्त कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनलॉकमध्ये एका ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन संबंधित यंत्रणांकडून केले जात असताना दुसरीकडे मात्र या नियमाकडे पुरते दुर्लक्ष केले जात आहे. गस्त कमी झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे बोलले जाते. कल्याण-डोंबिवलीतील प्रमुख चौकांमध्ये हे चित्र दिसून येते.

अशी होते गस्तीची नोंद‘आरएफआयडी’च्या २७ मशीनपैकी पाच मशीन महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळसेवाडीत प्रत्येकी तीन, खडकपाडा चार, रामनगर आणि विष्णूनगर, टिळकनगर प्रत्येकी तीन आणि मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार मशीन लावली असून एकूण ७८६ टॅग आहेत. या माध्यमातून गस्ती घातल्याची नोंद होते.

चोरीचे प्रमाण घटले कल्याण परिमंडळ हद्दीत दररोज गस्त घातली जाते. गस्त परिणामकारक होतेय की नाही, यासाठी आरएफआयडी प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवले जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चोरीचे प्रमाण कमी झाले आहे.- विवेक पानसरे,पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिसThiefचोरRobberyचोरी