शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर, मृत्युदरही कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 00:52 IST

नगरपालिकेच्या दंत महाविद्यालयातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल ९६ टक्क्यांवर गेला आहे. तर, येथील रुग्णालयाचा मृत्युदर अर्ध्या टक्क्याच्याही खाली आहे.

अंबरनाथ : कोरोना नियंत्रणासाठी अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या वतीने बाधितांचा वेळीच घेतलेला शोध, आग्रही चाचणी, अलगीकरण आणि विलगीकरण यंत्रणेचे यशस्वी नियोजन आणि बाधित रुग्णांवर प्रभावी उपचारांमुळे शहरात रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल ९० टक्क्यांवर गेला आहे. नगरपालिकेच्या दंत महाविद्यालयातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल ९६ टक्क्यांवर गेला आहे. तर, येथील रुग्णालयाचा मृत्युदर अर्ध्या टक्क्याच्याही खाली आहे.अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, याकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहरात आजपर्यंत एकूण ११ हजार ४५२ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, शहरात एकूण चार हजार ५०२ बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरातील एकूण रुग्णांपैकी तब्बल चार हजार ७९ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर, शहरात एकूण १७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दंत महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात आजपर्यंत दोन हजार ५४ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यातील एकूण एक हजार ९८० रुग्ण हे उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. या रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचा दर हा तब्बल ९६ टक्के इतका आहे. मागील दोन महिन्यांत या रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हा दर अवघा ०.१९ इतका आहे. यासोबतच शहरातील एकूण रुग्णांचा बरे होण्याचा दरही ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, शहरातील कोरोनाचा मृत्युदर हा अजूनही पालिकेची चिंता वाढविणारा आहे. हा मृत्युदर कमी करण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे.>शहरातील बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. त्यासोबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात असल्याने संसर्गाचे प्रमाण काही अंशी रोखण्यात यश येताना दिसत आहे.- प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस