वारस नोंदीअभावी पंचनामे करताना पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:48 PM2019-11-06T23:48:56+5:302019-11-06T23:49:08+5:30

नुकसानभरपाईबाबत संभ्रम : हयातच नसल्याने सही, जबाब कसे घ्यायचे? खंडाने शेती करणाऱ्यांचीही पंचाईत

Patchwork while scrapping due to inheritance records about rain | वारस नोंदीअभावी पंचनामे करताना पेच

वारस नोंदीअभावी पंचनामे करताना पेच

Next

मीरा रोड - अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती व भाजीपाल्याच्या नुकसानीसाठी तलाठ्यांनी पंचनामे सुरू केले आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींच्या सातबाºयांवर त्यांच्या वडील-आजोबांच्या नावाने नोंदी आहेत. तर काही शेतकरी खंडाने शेती करत आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांचे पंचनामे कसे करायचे? असा पेच सरकारी यंत्रणेसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे नुकसानीची भरपाई कोणाला द्यायची, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

अवकाळी पावसामुळे मीरा-भार्इंदरमध्ये आजही शेती तसेच भाजीपाला लागवड करणाºया शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. उदरनिर्वाह वा शेती-भाजीपाला या पारंपरिक व्यवसायाची जोपासना करण्यासाठीही शेतकरी शेती पिकवत आहेत. तलाठ्यांनी भार्इंदरच्या मुर्धा, राई, मोर्वा, डोंगरी, तारोडी, उत्तन, पाली तर काशिमीराच्या काशी, घोडबंदर, चेणे भागांतील नुकसान झालेल्या भातपीक आणि भाजीपाल्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी शासनाकडून नुकसानभरपाई मिळेल, अशी आस धरून असले तरी पंचनाम्यातील सरकारी निकषामुळे अनेक शेतकºयांना भरपाई मिळण्याबाबत अडचण निर्माण झाली आहे.
काही शेतकरी हे आपल्या वाडवडिलांपासून दुसºयांच्या जमिनींवर कसत आहेत. तर जे जमीनमालक आहेत त्यांचे वारसही संख्येने वाढले आहेत. शेती पिकवणाºया शेतकºयांचे नुकसान झाले असले तरी सातबारा नोंदी त्यांच्या नावे नसल्याने पंचनामा करून नुकसानभरपाई कोणाला द्यायची, असा प्रश्न आहे. सातबारा नोंदी असलेल्या मालकाच्या नावाने भरपाई दिली गेली तर नुकसान झालेल्या शेतकरायास भरपाई मिळणार नाही. तशीच अडचण वारस नोंद न झालेल्या शेतकºयांची झाली आहे. शेतकरी म्हणून भातपीक, भाजीपाला लागवड करत असले तरी सात-बारा नोंदी वडील-आजोबांच्याच नावे कायम आहेत. त्यांच्या वारसांनी वारसहक्त नोंद केली नसल्याने सध्या शेती करणाºया त्यांच्या वारस शेतकºयांची नावेच सातबारावर नाहीत. नोंद असलेल्या शेतकºयांचे जबाब, सही पंचनाम्यात घ्यावी लागत असल्याने ते हयातच नसल्याने पंचनामा तरी कसा करावा, अशी कोंडी झाली आहे.

एकनाथ शिंदे यांचा मुरबाडचा दौरा रद्द
च्मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी दौºयावर येणार होते. सकाळी शहापूर येथील दौºयानंतर ते मुरबाड तालुक्यात येणार होते. त्यांची भेट घेण्यासाठी शेतकरी आले होते. मात्र, हा दौरा रद्द झाल्याने शेतकºयांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुरबाड तहसीलदार कार्यालयात दिले.
च्तालुक्यातील भातपिकांच्या नुकसानीची भरपाई ठरवताना पीक आणि जमिनीचे झालेले नुकसान या बाबींचाही समावेश करावा, अशी मागणी मुरबाड तालुक्यातील शेतकºयांनी निवेदनाद्वारे केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील भातपीक, पेंढा निरु पयोगी झाला आहे.
च्पीक कापणीसाठी झालेला बेसुमार खर्च, त्याचप्रमाणे जोरदार पावसाने पूर येऊन शेतीचे बांध वाहून गेल्याने शेतात गाळ साचला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी लागणाºया खर्चाचाही सरकारने विचार करावा. तसेच पीक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भास्कर केदार आणि अनिल भोईर यांनी निवेदनात म्हटले आहे.

तलाठ्यांकडून पंचनामे
भार्इंदरच्या तलाठी अनिता पाडवी काही प्रकरणात वारसांचे जबाब घेऊन पंचनामे करून शेतकरायांना मदत मिळेल यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तर उत्तनचे तलाठी शेडगे यांनी खंडाने शेती पिकवणाºया शेतकºयांचे पंचनामे करून घेतले आहेत. शासनाचा नियम पाहता अशा नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई मिळेल का या बद्दल साशंकता निर्माण झाली आहे.


भिवंडी : भिवंडी उपविभागात अवकाळी पावसामुळे भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भिवंडी प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी बुधवारी सकाळी तालुक्यातील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी करून कृषी अधिकाºयांना विनाविलंब पंचनामे करण्याचे आदेश दिले. पाच दिवसांत उर्वरित पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत. यावेळी चाविंद्रा, निंबवली,पोगाव, भिनार आदी गावांसह तालुक्यातील विविध गावांना प्रांत अधिकारी डॉ. नळदकर यांनी भेटी दिल्या.
यावेळी तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे, मंडळ कृषी अधिकारी दया कदम, कृषी पर्यवेक्षक के.एल. गायकवाड, प्रदीप निकम, भाऊ भोईर, दिनेश कोळी आदी कृषी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यंदा चांगला पाऊ स झाल्यामुळे पिके बहरली होती. त्यामुळे शेतकरी खुशीत होते; मात्र या त्यांच्या खुशीवर पावसाने पाणी फेरले. या अस्मानी संकटामुळे शेतकºयांवर उपासमारीची वेळ आली आहे. नैसर्गिक आपत्तीतील नुकसानासाठी शेतकºयांना शासन निर्देशानुसार हेक्टरी २० हजार ४०० रु पयांच्या आर्थिक मदतीसह पीकविम्याची हेक्टरी ४३ हजार ८०० रु पयांची मदत देण्यात येणार असल्याचे डॉ. नळदकर यांनी सांगितले.

भिवंडी तालुक्यात २४० गावांमधून १६ हजार २०८ हेक्टर भातशेतीची लागवड करण्यात आली होती. यावर्षी पीक कर्जदार तीन हजार ४९९, तर बिगर कर्जदार ३५८ शेतकरी आहेत. सर्वच शेतकºयांच्या ९० टक्के भातपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना तत्काळ सरकारी आर्थिक मदत मिळावी, यासाठी भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. आजपर्यंत ८० टक्के पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत, तर उर्वरित पंचनामे पाच दिवसांत पूर्ण करण्यात येतील, असे डॉ. नळदकर आणि तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे यांनी सांगितले.

Web Title: Patchwork while scrapping due to inheritance records about rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.