सुट्या पैशांवरून प्रवाशाला बेदम मारहाण

By Admin | Updated: June 21, 2017 04:40 IST2017-06-21T04:40:56+5:302017-06-21T04:40:56+5:30

रिक्षा भाड्यांच्या सुट्या पैशांवरून सहा रिक्षाचालकांनी इंजिनिअरला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी गावदेवीत घडली

Passengers with breathless beat breathlessly | सुट्या पैशांवरून प्रवाशाला बेदम मारहाण

सुट्या पैशांवरून प्रवाशाला बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रिक्षा भाड्यांच्या सुट्या पैशांवरून सहा रिक्षाचालकांनी इंजिनिअरला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी गावदेवीत घडली. त्याच्या मानेवर वळ उठले असून त्याला लाथाबुक्कांनी मारहाण केल्याने बराच मुकामार लागला आहे. ये-जा करणारे नागरिक वेळीच धावून आल्याने माझा जीव वाचल्याने त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी मोहम्मद शेख याला ताब्यात घेतले. या घटनेने ठाण्यातील रिक्षाचालकांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे.
मुंबईतील गोवंडी येथे राहणाऱ्या तुषार म्हात्रे (२३) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो दोन -तीन दिवसांपूर्वी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एका ठिकाणी कामावर रूजू झाला होता. वागळे इस्टेट, कामगार हॉस्पिटल येथून शेअर रिक्षाने तो घरी जात होता. रिक्षा गावदेवीला आल्यावर त्याने रिक्षाचालकाला ५- रूपये दिले. सुटे पैसे नसल्याने रिक्षाचालकाने शिवीगाळीस सुरूवात केली. सहप्रवासी मुलीला धक्काबुक्की करीत त्याने मलाही धक्काबुक्की केली. नंतर त्याने अन्य रिक्षाचालकांना बोलवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सहा जण माझ्यावर तुटून पडले. पण तेथून जाणाऱ्या नागरिकांनी मला त्यांच्या तावडीतून सोडविले. या मारहाणीत तुषारच्या मानेवर वळ उठले असून त्याला मुका मार लागला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात रात्री उशीरपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही रिक्षा नेमकी कोणाच्या मालकीची होती, हे समजू शकले नाही. रिक्षेवर ठाण्यातील नेत्याचे चित्र रंगवल्याचे तुषारने सांगितले.

Web Title: Passengers with breathless beat breathlessly