Passenger injured when rickshaw overturns | रिक्षा उलटल्याने प्रवासी जखमी

रिक्षा उलटल्याने प्रवासी जखमी

अनगाव : भरधाव रिक्षाने वेग कमी केल्याने पाठीमागून येणाऱ्या रिक्षाचालकाचे नियत्रंण सुटल्याने रिक्षा उलटल्याने प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी भिवंडी-कल्याण रोडवरील गोवे टोलनाक्याजवळ घडली. झेनबबी शेख असे जखमी प्रवाशाचे नाव आहे.

भिवंडीहून प्रवासी घेऊन रिक्षा जात असताना पुढे भरधाव जाणाऱ्या रिक्षाने वेग कमी केल्याने पाठीमागून आलेल्या रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे रिक्षा उलटल्याने पुढे बसलेला प्रवासी जखमी झाला. याप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात कोनगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

----------

काल्हेर येथे दुचाकी पळविली

अनगाव : व्यापारी अरविंद प्रजापती यांनी ज्यूस सेंटरसमोर उभी केलेली त्यांची ६५ हजार किमतीची मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी काल्हेर येथे घडली आहे. काल्हेर येथील रूद्र पार्क येथे प्रजापती यांचे ज्यूस सेंटर आहे. त्यासमोर त्यांनी दुचाकी उभी केली होती. अनोळखी व्यक्तीने ती चोरल्याची तक्रार त्यांनी नारपोली पोलिसात दाखल केली आहे.

-----------

Web Title: Passenger injured when rickshaw overturns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.