ठाण्यातील ३०० इमारतींचा ‘ठाणेकर’ मोहिमेत सहभाग
By Admin | Updated: September 16, 2015 23:47 IST2015-09-16T23:47:29+5:302015-09-16T23:47:29+5:30
‘काहीतरी कर ठाणेकर’च्या माध्यमातून लोकमतने सुरू केलेल्या चळवळीला आता चांगलेच यश मिळू लागले आहे. काहीतरी कर ठाणेकर, या टॅग लाइनखाली शहरातील काही महत्त्वाचे विषय

ठाण्यातील ३०० इमारतींचा ‘ठाणेकर’ मोहिमेत सहभाग
- अजित मांडके , ठाणे
‘काहीतरी कर ठाणेकर’च्या माध्यमातून लोकमतने सुरू केलेल्या चळवळीला आता चांगलेच यश मिळू लागले आहे. काहीतरी कर ठाणेकर, या टॅग लाइनखाली शहरातील काही महत्त्वाचे विषय हाताळण्यासाठी लोकमतने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यातीलच उगाच हॉर्न वाजविणे बंद कर, या मोहिमेला ठाणेकरांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.
‘मोरयाचा जयजयकार कर, उगाच हॉर्न वाजविणे बंद कर’ असे म्हणून गणरायाचे स्वागत हे हॉर्न न वाजविता जल्लोषात करावे, असे आवाहन लोकमतने ठाणेकरांना केले असून त्याला ठाण्यातील ७५ सोसायट्यांतील ३०० इमारतींतील रहिवाशांनी पहिल्या टप्प्यात प्रतिसाद दिला आहे. शहरात आज वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. परंतु, त्यात अडकल्याने वाहनचालकांना हॉर्न वाजवावेच लागत आहेत. याचा त्रास वाहतूक पोलिसांसह वाहनचालक आणि आजूबाजूच्या सोसायट्यांनाही होत आहे. दरम्यान, यासंदर्भातील वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच आता काही सुज्ञ ठाणेकरांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी तयारी दर्शविली आहे.