शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शक्यतांपलीकडील प्रेरणा" या राष्ट्रस्तरीय वेबिनारमध्ये संयुक्त राष्ट्रांतील विद्यार्थ्यांचाही सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 15:49 IST

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा अॉनलाईन प्रेरणादायी उपक्रम संपन्न झाला.

ठळक मुद्देसर्व शक्यतांपलीकडील प्रेरणा" या विषयावर राष्ट्रस्तरीय वेबिनारसंयुक्त राष्ट्रांतील विद्यार्थ्यांचाही सहभागसतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा अॉनलाईन प्रेरणादायी उपक्रम

ठाणे : कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळात शिक्षणव्यवस्था पुरती कोलमडलेली आहे. या काळात  विद्यार्थी व पालकांना नैराश्याच्या या गर्तेतून सुखरूपणे बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यांना प्रेरक विचारांची मेजवानी देवून त्यांच्यातल्या नकारात्मकतेला मुळासकट नष्ट करता येईल. हा मुख्य हेतू लक्षात घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या इंग्रजी व आयटी विभागांतर्गत  "सर्व शक्यतांपलीकडील प्रेरणा"( Motivation beyond  all odd ) या विषयावर विनामूल्य एकदिवसीय राष्ट्रस्तरीय प्रेरणादायी सत्र शनिवारी आयोजित करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय वेबिनारला भारताबरोबरच सौदी आरेबिया, कुवैत, नेपाळ, ओमान, पेरू आणि संयुक्त राष्ट्रांतील विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

कार्यक्रमाची सुरूवात गीता कुलकर्णी या विद्यार्थिनीच्या सरस्वती वंदना व गणेश वंदना यांच्या सादरीकरणातून  झाली. पहिल्या सत्रात 'सहा इंचाचा खेळ' या विषयावर 'अॉनसाईट इलेक्ट्रो सर्व्हिस,मुंबई येथे प्रशिक्षण प्रमुख या पदावर कार्यरत नितीन नायर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. "माणूस आपल्या अवतीभवती अमर्याद प्रमाणात असलेले ज्ञान दोन कर्णेंद्रियांमधील ज्ञानेंद्रियांमार्फत आत्मसात करतो या दोन कर्णेंद्रियांसोबतच त्यांदरम्यानची ६ इंचाची जागा मानवाच्या यशस्वी आयुष्याची खेळपट्टी होय" असे ते म्हणाले. विचार म्हणजे नेमके काय? विचारांची उगमस्थाने, विचारांचे महत्त्व, यशासाठी सकारात्मक विचारांची आवश्यकता अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. मानवी मेंदूतील पेशींच्या सक्रीय क्रियाकलापातून  विचारांची उत्पती होते. आपण पाहिलेला एखादा चित्रपट, घटना,वाचलेले एखादे पुस्तक, आपल्या आजूबाजूला वावरणारी माणसे व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्यावरील प्रभाव या बाबी विचारप्रक्रियेला उर्जा देतात. सकारात्मक विचार-भावना यशोमार्ग दाखवतात. अपयशाला न घाबरता त्याला सामारे जाणे गरजेचे आहे, हे विचार मांडताना त्यांनी अल्बर्ट आइनस्टाइन, सचिन तेंडूलकर, दिपिका पादुकोण यांसारख्या  दिग्गजांची उदाहरणे दिली. तसेच विश्वास, समर्पण आणि उत्कटता या त्रिसुत्रीच्या बळावर वयाच्या १० व्या वर्षी झालेल्या गंभीर अपघातामुळे, जीवनात निर्माण झालेल्या संघर्षाला ते यशस्वीपणे कसे सामारे गेले, ते थोडक्यात सांगितले.         दुसऱ्या सत्रात 'सशस्त्र सेनेतील करिअर'  या विषयावर फोर्टीफाय मेंटर्स या संस्थेचे संस्थापक व निवृत्त लेफ्टनंट कर्नल ओमर पाठारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. NDA-राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी , IMA- भारतीय सैन्य अकादमीतील प्रशिक्षणकाळ आणि प्रत्यक्ष सीमेवर तैनात असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी विशद केले.  सैन्यदलात करिअर करू पाहणाऱ्यासाठी भूदल, हवाईदल, नौदल या तिनही सैन्यदलातील विविध विभागांची माहिती दिली. १०वी,१२वी नंतर उपलब्ध असलेल्या सैन्यदलातील संधींचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला. सैन्यात वैद्यकीय, अभियांत्रिकी    विभागातही अनेक संधी उपलब्ध होतात, असे ते म्हणाले. याचबरोबर सैनिकांना मिळणाऱ्या सोयी व सवलती त्यांनी विशद केल्या.    उद्या दि.२६ जुलै रोजी देशात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त एन.सी.सी च्या विद्यार्थिनींनी आज देशभक्तीपर गितांच्या गायनातून व नृत्य सादरीकरणातून भारतीय सैन्याला मानवंदना दिली. कार्यक्रमाची सांगता कुलदीप पाथर्वे या विद्यार्थ्याने गायिलेल्या राष्ट्रगिताने झाली. संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कमलेश प्रधान, व्यवस्थापन सदस्या मानसी प्रधान प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मराठे यांच्या अमोल मार्गदर्शनातून, विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागातून हा आंतरराष्ट्रीय उपक्रम राबवता आल्याचे आयोजन समिती प्रमुख डॉ.राधिका मुखर्जी यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय