शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील विद्यार्थी चीनमधील विज्ञान प्रदर्शनात घेणार सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 03:38 IST

विद्या प्रसारक मंडळाच्या ए.के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक चीन येथील विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणार असून सोमवारी ते चीनसाठी रवाना होत आहेत.

ठाणे  - विद्या प्रसारक मंडळाच्या ए.के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक चीन येथील विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणार असून सोमवारी ते चीनसाठी रवाना होत आहेत. चीनमध्ये दरवर्षी ‘कॅस्टिक’ या नावाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यात शाळेचे आठ विद्यार्थी आणि दोन शिक्षक सहभागी होत आहेत.चीनमधील चाँगचिंग शहरात होत असलेल्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी येत्या सोमवारी चीनला जात आहेत. बेल्ट अ‍ॅण्ड रोड सायन्स इनोव्हेशन हे एक वेगळे प्रदर्शन असून या प्रदर्शनात गेल्या वर्षीपासून शाळेने सहभाग घेतला आहे. यंदा दोन शिक्षकांनीही प्रथमच या प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे. कॅस्टिकमध्ये श्रिया ठाणेकर आणि दिव्या कद्रेकर या दोन विद्यार्थिनी वाहनातील प्रदूषण शोधणे आणि त्यावर नियंत्रण करणे, हा विज्ञान प्रकल्प सादर करणार आहेत. या प्रकल्पात या विद्यार्थिनींनी वाहनांमुळे होणारे प्रदूषण शोधून त्याची माहिती वाहनधारक आणि प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यास पाठवण्यासंबंधातील माहिती सादर करणार आहेत. अनुराधा शेट्ये आणि सिद्धार्थ वेर्णेकर हे दोन विद्यार्थी आरबॉट अर्थात रक्षणकर्ता यंत्रमानव हा प्रकल्प सादर करणार आहेत. आरबॉट या यंत्रमानवामुळे जमिनीखाली अडकलेल्या अगदी सूक्ष्म जीवांचाही शोध घेता येऊ शकतो. आरबॉट अतिसूक्ष्म ज्ञानवाहकांनी सुसज्ज असून सजीवाच्या शरीरातून बाहेर पडणारे अतिसूक्ष्म किरणेही तो अंत:प्रेरणेने शोधू शकतो. यावर कॅमेरा असून बचाव पथकाला या ठिकाणची माहिती मिळू शकते. बेल्ट अ‍ॅण्ड रोड स्टुडंट सायन्समध्ये आयुष म्हात्रे, मोहित जोशी, ऋतुजा पाटणकर आणि मिहीर आगाशे यांच्याबरोबरच पौर्णिमा साठे आणि गौरी मोहिले या शिक्षिकाही सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांना ठरावीक विषय देण्यात आले आहेत. शिक्षकांसाठी दोन हजार वर्षांपासूनच्या समुद्रसफारीवर प्रकल्प सादर करायचा आहे. या प्रदर्शनात सुधाकर आगरकर आणि विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय बेडेकरही जाणार आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीscienceविज्ञान