भिवंडीत घराचा काही भाग कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:41 IST2021-09-19T04:41:10+5:302021-09-19T04:41:10+5:30

भिवंडी : शहरातील दिवान शहा दर्गा परिसरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक या भागात ३ सप्टेंबरला एक मजली ...

Part of the house in Bhiwandi collapsed | भिवंडीत घराचा काही भाग कोसळला

भिवंडीत घराचा काही भाग कोसळला

भिवंडी : शहरातील दिवान शहा दर्गा परिसरातील आजमी नगर येथील टिपू सुलतान चौक या भागात ३ सप्टेंबरला एक मजली घराचा काही भाग कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले होते. त्याच परिसरात शनिवारी एक मजली घराचा काही भाग कोसळल्याने दुर्घटना घडली. सज्जद शेठ यांची ही मिळकत असून, या दुर्घटनेत पहिल्या मजल्यावर कुटुंबीय अडकून पडले होते. स्थानिक युवकांनी तत्काळ धाव घेत तीन पुरुष, दोन महिला व दोन मुले अशा एकूण सात जणांना बाहेर काढले. या घटनेची माहिती उशिरापर्यंत अग्निशामक दल, पालिका आपत्ती व्यवस्थापन व पोलीस यांना मिळाली नव्हती, हे विशेष. याबाबत महापालिका सूत्रांकडे विचारणा केली असता, या घराची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असताना सज्जाचा काही भाग कोसळला असल्याची माहिती दिली आहे.

----------------

Web Title: Part of the house in Bhiwandi collapsed