शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ढाबे, लॉन्स, ओपन स्पेससह रस्त्यावरील पार्किंगवर आता होणार करआकारणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 02:18 IST

उत्पन्न वाढीसाठी ठाणे महापालिकेचा निर्णय : परिवहन सेवेसाठी ३५ कोटी रुपयांची वाढ प्रस्तावित

ठाणे : उत्पन्न वाढीसाठी ठाणे महापालिका आता ढाबे, लॉन्स, ओपन स्पेससह रस्त्यावरील पार्किंगवर करआकारणी करणार आहे. स्थायी समितीनेच ही नवी करवाढ  सुचविली आहे. शिवाय ज्याची मंजुरी दिली त्याच आकाराचा जाहिरात फलक लावण्याची सूचना करून जाहिरात संस्थांना चाप लावला आहे. मंगळवारी महासभेस सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने ही नवी  करवाढ सुचविली आहे.कोरोनामुळे बांधकाम व्यावसायिकांना फटका बसला असला तरी ही परिस्थिती सुधारणार असल्याने शहरविकास विभागाकडून जास्तीचे उत्पन्न गृहीत धरले आहे. तर परिवहन सेवेसाठी ३५ कोटींची वाढ प्रस्तावित केली आहे.

रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी अंदाज खर्च तयार करताना त्यामध्ये पाणीपुरवठा, विद्युत व मलनि:सारण या विभागाकडील कामांचा समावेश करून रस्ते बांधकामांचा एकत्रित अंदाज खर्च तयार करावा, असे सुचविले आहे. महापालिकेच्या ज्या शाळांमध्ये पटसंख्या जास्त आहे, त्या शाळा प्रथम टप्प्यात डिजिटल कराव्यात, शाळा दुरुस्तीसाठी १६ कोटी, बालवाड्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली असून तर नवीन शाळा बांधकामांसाठी १३ कोटी ७१ लाखांची भरघोस तरतूद केली आहे. महिला बालकल्याण कार्यक्रमासाठी महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित तरतूद कमी केली होती. ती आता पुन्हा २५ कोटी रुपये केली आहे. त्याचबरोबर दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी १७ कोटी रुपये, महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र कक्ष तयार करून खोली तीच्यासाठी ही संकल्पना राबविण्यासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे.

भांडवली खर्चामध्ये केली वाढ क्लस्टर संक्रमण शिबिर बांधण्यासाठी नव्याने १५ कोटी ७५ लाख, रस्त्याचे कॉंक्रिटीकरणासाठी वाढीव ३४ कोटी १० लाखासह एकूण ६४ कोटी १० लाखांची तरतूद, रस्ते नुतनीकरणासाठी वाढीव २९ कोटी ४० लाखासह ५९ कोटी ४० लाखांची तरतूद, विकास आराखड्यातील रस्ते बांधणीसाठी १३८ कोटी, नाले बांधणीसाठी १६ कोटी ६५ लाख वाढीव तरतुदीसह ४१ कोटी ६५ लाख तरतूद, प्रभागात मलवाहिन्या टाकणे व हाउस कनेक्शनसाठी २० कोटी तरतूद होती ती २१ कोटी केली असून अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर असल्याने यात २० कोटी वाढ करून ६० कोटींची तरतूद केली आहे.

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका