शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पार्कीग धोरण पुन्हा लांबणीवर; चर्चा करायची असल्याचे सांगत सदस्यांनी प्रस्ताव केला तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 16:34 IST

Vehicle Parking : आठ वर्षापूर्वी स्मार्ट पार्कीग धोरण राबविण्याचा घेण्यात आला होता निर्णय

ठळक मुद्देआठ वर्षापूर्वी स्मार्ट पार्कीग धोरण राबविण्याचा घेण्यात आला होता निर्णयनव्या धोरणामध्ये १६८ रस्त्यांचा समावेश 

ठाणे  : कोरोनामुळे आर्थिक स्थिती नाजूक झालेल्या ठाणे  महापालिकेने आता उत्पन्न वाढीचा स्त्रोत म्हणून आठ वर्षे रखडलेले पार्कीग धोरण पुन्हा नव्याने महासभेच्या पटलावर आणले होते. परंतु वेळे अभावी आणि यावर सविस्तर चर्चा करायची असल्याने हा प्रस्ताव बुधवारी झालेल्या महासभेत तहकूब ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पार्कीग धोरण पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून रस्यावरील वाहतुक सुरळीत व्हावी, वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका व्हावी या उद्देशाने आठ वर्षापूर्वी स्मार्ट पार्कीग धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार यासाठी शहरातील १७७ रस्त्यांवर ९८५५ वाहने पार्क करण्याची सुविधा यातून मिळणार होती. तसेच या रस्त्यांची अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी करुन त्यापोटी वाहनांसाठी शुल्क आकारले जाणार होते. या योजनेसाठी महापालिकेला १८ कोटींचा खर्च करावा लागणार होता. तर संबंधित ठेकेदार उत्पन्नातील काही वाटा महापालिकेला देणार होता. या कामाकरिता १५ वर्षांच्या कालावधीसाठी निविदा काढण्यात आली होती. त्यास महासभेने देखील मंजुरी मिळाली होती. पंरतु निवेदेलाच प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस ती रद्द करण्यात आली. 

नव्यानं धोरण राबवण्याचा निर्णय

त्यानंतर आता पुन्हा नव्याने नव्याने पार्कीग धोरण राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी प्रभाग समिती स्तरावर पुन्हा सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार आता परंपरागत पद्धतीने रस्त्यावर सशुल्क पार्कीग धोरण राबविण्यात येणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. आता नव्या धोरणामध्ये १६८ रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. तरी या सर्वच रस्त्यांवर ११ हजार ९३१ वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण केली जाणार आहे. आधीच्या धोरणात ही संख्या कमी होती. ती आता नव्या धोरणात वाढतांना दिसून आली आहे. यामध्ये ६४७४ दुचाकी, १५४६ तीनचाकी, ३३६० हलकी चारचाकी, ५४८ अवजड चारचाकी वाहनांची पार्कीग येथे होऊ शकणार आहे. त्यानुसार आता हा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला होता.रस्त्यांच्या बाबतीत आक्षेप

परंतु या प्रस्तावात काही रस्त्यांच्या बाबतीत नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, आमच्या प्रभागातील रस्ते घेऊ नका अशी भूमिका देखील काही नगरसेवकांनी महासभेत घेतली. त्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ हवा असल्याचे सांगत, त्यासाठी वेळ हवा असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. त्यामुळे सविस्तर चर्चा करण्यासाठी हा प्रस्ताव तहकूब करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcarकारParkingपार्किंग