शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंग खंडणीखोर, त्यांच्यासह २८ आरोपींना कडक शिक्षा व्हावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 00:26 IST

लोकांकडून पैसे घेणे, खोट्या केसेस दाखल करणे आणि मकोका लावणे हाच उद्योग मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

ठळक मुद्देतक्रारदार सोनू जालान यांची मागणी पोलीस महासंचालक संजय पांडे यांना देणार पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : लोकांकडून पैसे घेणे, खोट्या केसेस दाखल करणे आणि मकोका लावणे हाच उद्योग मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. ते खंडणीखोर आहेत. त्यांच्यासह २८ आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दाखल करणारे क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी शुक्रवारी केली. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे आपण नि:पक्ष तपासासाठी पत्र देणार असल्याचेही ते म्हणाले.जालान यांच्याकडून तब्बल साडेतीन कोटींची खंडणी उकळल्याचा आरोप परमबीर यांच्यावर आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी शुक्रवारी सकाळपासून ते ठाणेनगर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. याअनुषंगाने सोनूदेखील ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच वकील सागर कदम यांच्यासह ठाण मांडून उभे होते. ते पुढे म्हणाले, २०१८ मध्ये ठाणे पोलीस आयुक्त असताना परमबीर हे वादग्रस्त अधिकारी म्हणून राहिले आहेत. गँगस्टर रवी पुजारी हादेखील सिंग यांचाच भागीदार आहे. कोणत्याही केसमध्ये रवी पुजारी यांचे नाव टाकले जाते. यातून कोणालाही मकोका लावण्यासाठी पुजारीचे नाव घेतले जायचे. आपल्यालाही दहा कोटींची मागणी करुन तीन कोटी रुपये घेतले. त्यावेळी सिंग यांच्यासह प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे हे अधिकारीही होते, असेही ते म्हणाले. परंतु, आता ठाणे पोलिसांकडून सुरु असलेल्या चौकशीवर नाराज असल्याचे ते म्हणाले. आपण नेमलेले सरकारी वकील प्रदीप घरत यांना पोलीस कोणतेही सहकार्य करीत नाहीत. पोलिसांच्या या नाकर्तेपणामुळेच दोन आरोपींना जामीन झाला. तसेच इतरांच्याही जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगत सोनू यांनी ठाणे पोलिसांच्या तपासावर अविश्वास व्यक्त केला आहे.तपास अधिकारी सरकारी वकीलांना कोणतीच माहिती देत नाहीत. त्यामुळेच दोन आरोपींचा जामीन झाला. संजय पुनामिया याला वैद्यकीय कारणास्तव तर तारिक परवीन याला तांत्रिक कारणामुळे जामीन झाला. तरीही आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास वाटतो, असेही जालान म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी