ठाणे : ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह सर्व २८ आरोपींविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करावी, अशी मागणी केतन तन्ना आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडे मंगळवारी केली. परमबीर सिंग हे ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी असताना त्यांच्यासह तत्कालीन खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे आदी २८ जणांनी सोनू आणि केतन यांच्यावर दबाव आणून खंडणी उकळल्याची फिर्याद दाखल आहे. -वृत्त/२
‘सिंग यांच्यासह सर्व आरोपींविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 07:39 IST