प. बंगालमधील आरोपीला अटक

By Admin | Updated: June 2, 2017 05:16 IST2017-06-02T05:16:11+5:302017-06-02T05:16:11+5:30

पश्चिम बंगाल येथील सरिना खातून (१९) हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करू न तिचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत घालून रस्त्याच्या

Par. The accused in Bengal arrested | प. बंगालमधील आरोपीला अटक

प. बंगालमधील आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पश्चिम बंगाल येथील सरिना खातून (१९) हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करू न तिचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत घालून रस्त्याच्या कडेला फेकून देणाऱ्या सुरत मंडल (४५) याच्या मुसक्या आवळण्यात मानपाडा आणि मेनेक्शन पोलिसांना यश आले. मंडल हा सरिनाचा मावसा (मावशीचा नवरा) असून पैशांच्या देवणघेवाणीवरू न त्याने तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
२७ एप्रिलला पश्चिम बंगाल येथील मेनेक्शन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरिना खातून हिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला. तिच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून तिला मारण्यात आले होते. हत्येनंतर सुरत हा बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचा संशय बळावला. पोलिसांनी त्याचा मोबाइल ट्रेस केला असता तो डोंबिवलीत असल्याचे निदर्शनास आले. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना गुरुवारी मेनेक्शन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मानपाडा पोलीस ठाण्याचे ज्योतीराम साळुंखे, किरण सोनावणे यांनी सापळा रचून मंडलला अटक केली. मंडल हा लोढा गृहसंकुलाच्या उभारणीच्या कामात मजूर म्हणून काम करत होता. त्याला मेनेक्शन पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे राऊत यांनी सांगितले.

Web Title: Par. The accused in Bengal arrested