उल्हासनगर : महापालिका निवडणूकीचे वारे वाहताच माजी आमदार पप्पू कलानी सक्रिय झाले. त्यांनी समर्थकांचे बैठकसत्र सुरू केल्या असून बैठकीला ओमी कलानी यांच्यासह कलानी समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या बैठकसत्राने मात्र विरोधी पक्ष नेत्याच्या पोटात आल्याचे बोलले जाते.
उल्हासनगरचेराजकारणात पप्पू कलानी यांच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. असी परिस्थिती आजही कायम असून सर्वच पक्षाच्या मुख्य नेत्यांनी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकी साठी कलानी महलच्या पायऱ्या झिजाविल्या आहेत. भाजपसह शिंदेसेना, ठाकरेसेना, काँग्रेस, पवारगट आदी नेत्यांना महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी कलानी कुटुंब हवे आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ओमी कलानी यांचा कुमार आयलानी यांनी पराभव केला. या पराभवाचे उष्टे काढण्यासाठी पप्पू कलानी यांनी महापालिका सत्ता हाती ठेवण्यासाठी त्यांच्या जुन्या व तरुण समर्थकांची जुळवाजुळव सुरु केली. पप्पू कलानी यांना ओमी कलानी, पंचम कलानी, नेरेंद्र कुमारी, मनोज लासी, संजय सिंग, कमलेश निकम, सुरेश गायकवाड, सुमित चक्रवर्ती, शिवाजी रगडे आदी जणांची साथ मिळाली आहे.
पप्पू कलानी हे शरद पवार गटाचे की टीओकेचे?
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर पप्पू कलानी यांनी जुने सहकारी तसेच तरुण कार्यकर्ते यांच्या सोबत बैठकसत्र सुरु केले. अश्याच बैठका प्रत्येक कॅम्प परिसरात घेण्याचे संकेत कलानी यांनी दिली. पप्पू कलानी जेल मध्ये असताना ओमी कलानी यांनी टीओके या राजकीय संघटनेची स्थापना करून भाजपा सोबत युती केली होती. ओमी कलानी यांच्यामुळे भाजपाला मीना आयलानी यांच्या रूपाने पहिला महापौर मिळाला होता. कलानी यांनी घेतलेल्या बैठका ह्या टीओके की शरद पवार गटाच्या अंतर्गत होत्या. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शरद पवारांचे सैनिक - कमलेश निकम
पप्पू कलानी यांनी घेतलेल्या बैठका टीओकेच्या की शरद पवार गटाच्या अंतर्गत झाल्या?. असा प्रश्न कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम यांना विचारला. तेव्हा त्यांनी आम्ही शरद पवार गटाचे सैनिक असल्याचे उत्तर दिले.