पोलिसाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 23:57 IST2017-07-30T23:57:12+5:302017-07-30T23:57:12+5:30
वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी कारवाई केल्याच्या रागातून वाहतूक पोलिसांना अश्लील शिवीगाळ व एका हवालदारास मारहाण केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी अंबरनाथ येथील लक्ष्मण नाईक याला अटक केली.

पोलिसाला मारहाण
ठाणे : वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी कारवाई केल्याच्या रागातून वाहतूक पोलिसांना अश्लील शिवीगाळ व एका हवालदारास मारहाण केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी अंबरनाथ येथील लक्ष्मण नाईक याला अटक केली.
नौपाडा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र काटकर आणि पोलीस शिपाई पवार, हवालदार महापुरे हे तीन हातनाक्यावर शुक्रवारी कारवाई करत होते. याचदरम्यान, नाईक तेथून विनाहेल्मेट जाताना त्यांना आढळला. त्यामुळे पवार यांनी कारवाई करत पावती फाडली. याचाच राग मनात धरून नाईक याने अश्लील हावभाव करून शिवीगाळ केली. तसेच महापुरे यांना ठोशाबुकक्याने मारहाण करत, ठार मारण्याची धमकी दिली. नाईकविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच शुक्रवारी रात्री त्याला पोलिसांनी अटक केली.