शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

पंडित जोशी रुग्णालय सरकारने ताब्यात घ्यावे; आरोग्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:57 IST

भोंगळ कारभाराचा फटका; प्रशासन, लोकप्रतिनिधींची उदासीनताही कारणीभूत

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिके ची उदासीनता आणि भोंगळपणामुळे वादग्रस्त ठरलेले भाईंदरचे पंडित भीमसेन जोशी रुग्णालय चालवण्यास सरकारने नकार दिल्यानंतर पालिका आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे याप्रकरणी भाजप आमदार नरेंद्र मेहता व पालिका आयुक्त बालाजी खतगावकर यांनी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सरकारने रुग्णालय त्वरित घेण्याची विनंती केली आहे.सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या तंबीनंतर पालिकेने चार मजली इमारत बांधून २०० खाटांचे रुग्णालय खानापूर्ती म्हणून २०१६ मध्ये सुरू केले. परंतु, रुग्णालय म्हणून अत्यावश्यक असणारी आयसीयू, एनआयसीयू, शस्त्रक्रियागृह आदी सुविधाच पालिकेने केलेल्या नाहीत. त्यातच चांगले डॉक्टर, आवश्यक कर्मचारीवर्ग नेमता आला नाही. जे नोकरीस लागले होते, त्यातील अनेकजण राजकीय व प्रशासकीय जाचामुळे काम सोडून गेले.२६ फेब्रुवारी २०१८ रोजी सरकारने आदेश काढून जोशी रुग्णालय पालिकेकडून हस्तांतरणासह सामान्य रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २५ कोटींची तरतूद करत एकूण ३६५ पदनिर्मितीस मंजुरी दिली. २४ मे २०१८ रोजी रुग्णालय हस्तांतराचा करार झाला. त्यामुळे २३ मे २०१९ पर्यंत रुग्णालय चालवण्याची जबाबदारी महापालिकेची होती. परंतु, पदांची मंजुरी सरकारने केली नाही, तर महापालिकेनेही शस्त्रक्रियागृह, आयसीयू आदी अत्यावश्यक बाबींची पूर्तताच केली नाही. महापालिकेच्या या भोंगळपणामुळे सरकारच्या समितीने १३ मे रोजी पाहणी अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार आरोग्यसेवा संचालनालयाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांनी आयुक्तांना पत्र पाठवून अटींची पूर्तता होईपर्यंत रुग्णालय हस्तांतरित होऊ शकत नाही, असे स्पष्ट कळवले होते.आधीच पालिकेने काही वर्षांपासून आयसीयू, शस्त्रक्रियागृह आदी आवश्यक सुविधाच दिल्या नाहीत. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याने काहींचे बळी गेले. तक्रारी आणि गैरसोयी सतत असल्याने रुग्णालय नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. मानवी हक्क आयोगानेही पालिकेला नोटीस बजावलेली आहे. मुळात रुग्णालय चालवण्यास महापालिका आणि लोकप्रतिनिधी इच्छुक नाहीत. सरकारने रुग्णालय चालवण्यास नकार दिल्याने पालिकेची पुरती नाचक्की झाली आहे. आलिशान दालने, पर्यटन दौरे, मनमानी कंत्राट आणि निधीची उधळपट्टी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी करत असताना नागरिकांसाठी मात्र आयसीयू, शस्त्रक्रियागृह, चांगले डॉक्टर व औषधोपचार मात्र दिले जात नसल्याबद्दल टीकेची झोड उठत आहे.आता याप्रकरणी आ. मेहता, आयुक्त खतगावकर यांनी आरोग्यमंत्री शिंदे यांची बुधवारी भेट घेऊन त्यांना साकडे घातले. सरकारने त्वरित रुग्णालय ताब्यात घ्यावे, अशी मागणी मेहता व आयुक्तांनी केली. पालिकेने आयसीयू आदी प्रलंबित कामांची निविदा काढली असल्याचे सांगितले.बैठकीत हे घेतले निर्णयआरोग्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत जोशी रुग्णालयास सिव्हीलचा दर्जा देणे, रुग्णालय सरकारने चालवण्यास घेणे तसेच अपंगत्व प्रमाणपत्र देणे व मार्गदर्शन केंद्र सुरू करणे, असे निर्णय घेण्यात आल्याचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलEknath Khadaseएकनाथ खडसेHealthआरोग्य