शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

कलानी का हाथ भाजप के साथ, पंचम यांना उमेदवारीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 00:33 IST

माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी किंवा पत्नी ज्योती कलानी यांना थेट उमेदवारी दिली तर आपल्यावर टीका होईल, याची जाणीव झाल्याने भाजपने कलानी यांच्या स्नुषा पंचम यांना विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहेत

- सदानंद नाईकउल्हासनगर : माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी किंवा पत्नी ज्योती कलानी यांना थेट उमेदवारी दिली तर आपल्यावर टीका होईल, याची जाणीव झाल्याने भाजपने कलानी यांच्या स्नुषा पंचम यांना विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. ज्योती या भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्या तरी सुनेचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे उल्हासनगरात ‘कलानी का हाथ भाजप के साथ’मुळे राष्ट्रवादी काँग्रेस क्षीण होऊन तेथे भाजप प्रबळ होण्याची चिन्हे आहेत.राष्ट्रवादीच्या शहरजिल्हाध्यक्ष व आमदार ज्योती कलानी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबात उमेदवारी दिली जाणार की, भाजपच्या आयलानी यांचा विचार केला जाणार यावरुन गेले काही दिवस तर्कवितर्क केले जात होते. अखेरीस ज्योती यांच्या राजीनाम्यामुळे कलानी यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. उल्हासनगरातील राष्ट्रवादी काँग्रेस ‘कलानीमुक्त’ झाल्याबद्दल महापालिकेतील गटनेते भरत गंगोत्री यांनी आनंद व्यक्त केला.शिवसेना-भाजपची १९९५ मध्ये राज्यात सत्ता येण्यामागे बाबरी मशिदीचे पतन हे जसे कारण होते तसेच तत्कालीन भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची ‘राजकारणाच्या गुन्हेगारीकरणा’विरोधातील लढाई हेही कारण होते. मुंडे यांनी कलानींवरुन शरद पवार यांना लक्ष्य केले होते. मात्र तरीही पवार यांनी कलानी यांना अंतर दिले नाही. मात्र उल्हासनगरात राष्ट्रवादीला नामोहरम करण्यासाठी भाजपने अगोदर कलानीपुत्र ओमी व त्यांची पत्नी पंचम यांना पक्षात प्रवेश दिला. आता ज्योती यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याने भाजपला उल्हासनगर काबीज करणे सोपे होणार आहे.उल्हासनगरात राष्ट्रवादी मजबूत होण्यासाठी शरद पवार यांनी २००२ मध्ये तत्कालीन शहरजिल्हाध्यक्ष आर. आर. पाटील यांचा राजीनामा घेऊन ज्योती यांची निवड केली. उल्हासनगरात कलानी यांच्यामुळे राष्ट्रवादीने महापालिकेत सत्ता गाजवली. आता कलानी हेच उल्हासनगरात राज्य करतील व भाजप सत्ता गाजवल्याचा दावा करील.पप्पू कलानी यांना भटीजा हत्याकांडात जन्मठेप झाली आहे. म्हणजेच मुंडे यांनी केलेले आरोप कायद्याच्या कसोटीवर खरे ठरले आहेत. मात्र हे वास्तव नजरेआड करून भाजपने महापालिका निवडणुकीत ओमी यांच्याशी सूत जुळवले व सत्ता संपादन केली. मात्र ज्योती या राष्ट्रवादीत तर ओमी व पंचम हे भाजपमध्ये असे दोन्ही परस्परविरोधी पक्ष एकाच घरात नांदत असल्याचे चित्र आतापर्यंत कलानी कुटुंबात दिसत होते. महापालिका निवडणुकीत ज्योती यांनी आपली शक्ती राष्ट्रवादीसाठी नव्हे तर भाजपसाठी खर्र्ची घातल्याचा आरोप झाला.टीकेची धार बोथट करण्याचा प्रयत्नज्योती किंवा ओमी यांना थेट भाजपची उमेदवारी बहाल न करता पंचम यांना करून स्थानिक भाजप नेत्यांनी आपल्यावरील टीकेची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्योती कलानी यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवल्यावर राष्ट्रवादीने शुकवारीच पक्ष निरीक्षक सुधाकर बढे यांना उल्हासनगरात पाठवून नवीन शहर कार्यकारिणी घोषित केली. त्यामुळे कलानी कुटुंबाशी राष्ट्रवादी काँग्रेस संघर्ष करीत असल्याचे वेगळे चित्र यंदाच्या निवडणुकीत दिसेल, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपा