उल्हासनगरमध्ये पाडकाम कारवाईने धडकी
By Admin | Updated: October 3, 2015 23:48 IST2015-10-03T23:48:21+5:302015-10-03T23:48:21+5:30
शहरातील कॅम्प १ व २ मधील पाडकाम कारवाईच्या निषेधार्थ भाजपा नगरसेवकासह कार्यकर्त्यांनी अतिक्रमण पथकाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिकांच्या

उल्हासनगरमध्ये पाडकाम कारवाईने धडकी
उल्हासनगर : शहरातील कॅम्प १ व २ मधील पाडकाम कारवाईच्या निषेधार्थ भाजपा नगरसेवकासह कार्यकर्त्यांनी अतिक्रमण पथकाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिकांच्या विरोधाला न जुमानता अतिक्रमण विभागाने अनेक बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. कारवाईच्या आड येणाऱ्या नगरसेवकांसह इतरांवर कारवाईची तंबी आयुक्तांनी दिली आहे.
महापालिका हद्दीतील अवैध बांधकाम प्रकरणी नव्याने न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली असून १५ आॅक्टोबर रोजी प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नगरसेवक गुंतल्याची चर्चा पालिका वर्तुळात होत असून नगरसेवकांसह पत्रकार, सामाजिक संस्था व नागरिकांनी बांधकामांच्या तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची यादी उपायुक्त नितीन कापडणीस यांनी बनविली आहे. पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना सलग १० दिवसांचा पोलीस बंदोबस्त आयुक्त मनोहर हिरे यांनी मागितला होता. पोलीस संरक्षण मिळताच आयुक्तांनी धडक पाडकाम कारवाई सुरू केली आहे. कॅम्प नं-१ व २ परिसरातील भाजपा नगरसेवक जमनुदास पुरस्वानी व मीना कौर लभाना यांच्या वॉर्डांतील बांधकामे जमीनदोस्त केली. नगरसेवकपद रद्द का करू नये? आयुक्तांचा पवित्रा शहरातील बहुतांश अवैध बांधकामे नगरसेवकांच्या देखरेखीखाली होत आहेत. असे अढळून आले आहे.