शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पालघर पोलिसांची कामगिरी : मुसक्या आवळताच भावाचा झाला ‘पोपट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:28 IST

प्रेमप्रकरणातून पाम टेम्भी येथून आपल्या मजनूला त्याच्या आसाममधील मूळ गावी पळून गेलेल्या लैलासह पालघर पोलिसांनी गोहाटी येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी संजय अमूल्य बर्मन याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आला आहे.

हितेंन नाईक पालघर : प्रेमप्रकरणातून पाम टेम्भी येथून आपल्या मजनूला त्याच्या आसाममधील मूळ गावी पळून गेलेल्या लैलासह पालघर पोलिसांनी गोहाटी येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी संजय अमूल्य बर्मन याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आला आहे.सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पामटेम्भी येथे फिर्यादीचे किराणाचे दुकान असून त्याला दोन मुली आहेत. त्यातील एक मुलगी पालघरच्या एका महाविद्यालयात १२ वी सायन्समध्ये शिकत असून तिचे आपल्या घरात भाडेकरू म्हणून राहणाºया आरोपी संजय बर्मन यांच्या सोबत प्रेमसंबंध होते. याची कल्पना तीच्या घरच्यांना आल्या त्यांनी या प्रेमप्रकरणाला विरोध दर्शविला होता. १५ जानेवारी रोजी आपण कॉलेजला जातो असे सांगून ती घरातून गेली परंतु ती संध्याकाळपर्यंत घरी आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेच आढळून न आल्याने पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पालघरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी चौकशी केली असता आरोपीने तिचे अपहरण करून तिला आसाममधील गोहाटी (नोनामती) येथे नेल्याची माहिती मिळाली. कुर्ला टर्मिनस येथून सुटणाºया गोहाटी एक्स्प्रेसने ते गेल्याचे कळल्या नंतर उपनिरीक्षक सय्यद तौफिक आणि पोलीस मोहन पवार यांनी विमान पकडून सरळ गोहाटी गाठले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून मुलीला तिच्या नातेवाईकाच्या ताब्यात दिले.पोलिसांनी केली तत्परतेने कारवाई-नोनामतीला पोहचण्यात पोलिसांना थोडा उशीर झाला त्यामुळे हे प्रेमी निसटले. सय्यद यांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या भावाचे हार्डवेअरचे दुकान असल्याची माहिती काढून साहित्याची आॅर्डर द्यायच्या नावाखाली बोलावून ताब्यात घेतले. अधिक चौकशी अंती त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच नोनामती या आपल्या गावातील घरात दोघे असल्याचे त्यांनी सांगितल्यावर आरोपी बर्मन व त्या मुलीला तेथून ताब्यात घेतले व पालघरला आणले.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा